आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आय मिस जॉर्ज बुश ’, टी-शर्टची जोरदार विक्री, लोकप्रियता वाढवण्याचा फंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या लोकप्रियतेत घट झाल्याचे लक्षात येताच रिपब्लिकन पार्टीने लोकप्रियता वाढवण्यासाठी सध्या ‘आय मिस डब्ल्यू’ टी-शर्टच्या विक्रीचा सपाटा लावला आहे.

टी-शर्टवर माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांचा फोटोदेखील प्रकाशित करण्यात आला आहे. पक्षाने नवीन निधी संकलनाला सुरुवात केली आहे. बुश यांच्या जन्मदिनी अर्थात 6 जुलैला या उपक्रमाला सुरुवात झाली. रिपब्लिकन नॅशनल कमिटीच्या वतीने (आरएनसी) टी शर्टची विक्री केली जात आहे. बुश यांच्या फोटोखाली आय मिस डब्ल्यू असा मजकूर टाकून रिपब्लिकनने नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. देशाच्या इतिहासात जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी अनेक आव्हानात्मक क्षणी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाचे स्मरण होणे स्वाभाविक आहे, असे आरएनसीने म्हटले आहे.

आरएनसीची भूमिका काय ?
अमेरिकेने पिछाडीवर राहून नेतृत्व करावे, असे ओबामा यांचे म्हणणे आहे. तुम्हाला असे वाटत नसेल तर हे टी-शर्ट खरेदी करण्यात यावे, अशी भूमिका आरएनसीचे अध्यक्ष रिंस प्रिबस यांनी मांडली.

नेमके मतपरिवर्तन कसे ?
नुकत्याच झालेल्या एका पाहणीत 52 वर्षीय ओबामा यांची लोकप्रियता घसरत चालल्याचे सांगण्यात आले. दुसर्‍या महायुद्धानंतरचे सर्वात वाईट नेतृत्व असे मत अमेरिकेतील 33 टक्के नागरिकांनी व्यक्त केले आहे. यातील 28 टक्के नागरिकांनी बुश यांचे नेतृत्व योग्य होते, असे मत मांडले आहे.