आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुराचा अंदाज लावता येणार 11 महिने आधीच, नवे तंत्र विकसित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी विनाशकारी पुराचा अंदाज 11 महिने आधी कळू शकणारी पद्धत शोधून काढली आहे. उपग्रह निगराणीतून नदी खोर्‍यात मिनिटा-मिनिटाला होणार्‍या गुरुत्वाकर्षणात्मक बदलावरून हा अंदाज बांधण्यात येणार आहे.

संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांनी नदी खोर्‍यात किती पाणी साठले जाऊ शकते याच्या मोजमापाची पद्धती शोधून काढली. एखाद्या बकेटमध्ये जास्तीत जास्त किती पाणी भरले जाऊ शकते, ही संकल्पना नदी खोर्‍यासाठी लागू करण्यात आली, अशी माहिती पृथ्वी शास्त्रज्ञ जे. टी. रेगर यांनी दिली.

रेगर आणि सहकार्‍यांनी उपग्रह माहितीच्या आधारे 2011 च्या मिसोरी पुराच्या आधी किती पाणी जमिनीत मुरले याची नोंद घेण्यात आली. सांख्यिकी प्रतिकृतीच्या आधारे पाच महिन्यांपूर्वी मोठ्या पुराच्या घटनांचा अंदाज बांधण्यात आला आहे. याच्याच पुढे जाऊन हा अंदाज 11 महिने आधी व्यक्त करता येऊ शकतो, असे रेगर म्हणाले. संशोधकांनी पुराची शक्यता असलेल्या ठिकाणांची माहिती नासाच्या ट्विन उपग्रहाद्वारे मिळवली.
फोटो - फाईल