आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भलत्यासलत्या मागण्या करू नका, स्विस बँकेचा भारताला ठेंगा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / झुरिच - काळ्या पैशांबाबत भारताने स्विस बँकेवर कितीही दबाव वाढवला असला तरी त्याला दाद मिळालेली नाही. भलत्यासलत्या मागण्या करू नका, अशा शब्दांत स्विस बँकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

द असोसिएशन ऑफ फॉरेन बँक्स इन स्वित्झर्लंडकडून भारताच्या विनंतीला एक प्रकारे धुडकावले आहे. चार दशकांपासून बँकांची ही संघटना आहे.

स्विस बँकेतील भारतीयांचा तपशील देण्यासंबंधी भारताने अलीकडेच विनंती केली होती. म्हणूनच एक देश म्हणून स्वित्झर्लंडमध्ये भारताची प्रतिष्ठा जरूर आहे, परंतु ही प्रतिष्ठा आर्थिक विषयांशी संबंधित नाही, या गोष्टीचे भान भारताने राखले पाहिजे, असे बँक असोसिएशनचे सरचिटणीस मार्टिन मॉरीर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले. यूबीएस या बँकेत भारतातील काळा पैसा मोठ्या प्रमाणात जमा करण्यात आलेला आहे. या बँकेतील भारतीयांच्या पैशांचा तपशील देण्यास मात्र यूबीएसच्या प्रवक्त्याने नकार दिला.

आम्ही आंतरराष्ट्रीय नियमांचे काटेकोरपणे पालन करतो. बँक अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे. त्याचबरोबर गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारालादेखील बँकेच्या व्यवहारात अजिबात स्थान नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर भारतीयांचा तपशील देता येणार नसल्याचेही सांगितले.