आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IN PICS: तायक्वांदोमध्ये ब्लॅकबेल्ट आहे बिलावल, जाणून घ्या रोचक FACTS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आणि माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचे चिरंजीव बिलावल भुत्तो-झरदारी यांनी काही दिवसांपूर्वी भारताकडून काश्मीर घेतल्याशिवाय राहाणार नाही, अशी मुक्ताफळे उधळली होती. तर, भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन काढून टाकण्याची ताकद भारतात असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतरही बिलावल यांचा वाचाळपणा सुरुच होता. त्याची सोशल मीडियावरुन खिल्ली देखील उडवली गेली. चला जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या रोचक गोष्टी.
- बिलावल यांची आई बेनझीर भुत्तो यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले होते. एवढेच नाही, तर 1979 मध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टीची (पीपीपी) स्थापना करणारे बिलावल यांचे आजोबा झुल्फिकार अली भुत्तो यांनी देखील येथेच शिक्षण घेतले होते.
- बेनझीर भुत्तो पंतप्रधान होण्याच्या एक महिना आधी बिलावलचा जन्म झाला होता. त्यामुळे त्या त्याला लकी मानत होत्या.
- बिलावलचा अर्थ, यासारखा कोणी नाही.
- ऑक्सफर्ड येथे त्यांच्या सुरक्षेवर दरवर्षी जवळपास एक मिलिअन पाउंड खर्च होत होते. ( भारतीय रुपयानुसार, जवळपास 9 कोटी, 93 लाख रुपये.)
- बिलावल तायक्वांदो ब्लॅक बेल्ट आहे.

पुढील स्लाइडमध्ये, ऑक्सफर्ड विद्यापीठात आपल्या लाइफस्टाइलमुळे चर्चेत होता बिलावल