आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेसबॉलप्रिय अमेरिकेत नाणी चितारण्याची स्पर्धा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात क्रिकेटचे जेवढे वेड आहे तेवढेच अमेरिकेत बेसबॉलप्रिय लोक आहेत. अमेरिकेत नाणी आणि नोटा बनवणाया मिंट या संस्थेला बेसबॉल संकल्पनेवर ‘व्हॉट ग्रेट अबाऊट बेसबॉल’ नाणी तयार करायची होती. यासाठी संस्थेने तीन गटांत स्पर्धा आयोजित केली. 0 ते 5, 6 ते 10 आणि 11 ते 13 वर्षांच्या मुलांचा यात समावेश होता. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक मुलांनी चांगले डिझाइन सादर केले. या तिन्ही गटांमधून एक-एक आणि 16 उत्तेजनार्थ अशी नाणी निवडण्यात आली. ही नाणी चितारणाया मुलांना पुढील वर्षी ग्रँड प्राइझच्या रूपात ‘2014-पी नॅशनल बेसबॉल हॉल ऑफ फेम’चे रुपेरी डॉलर दिले जाणार आहे. तसेच उत्तेजनार्थ विजेत्याला ‘2014-एस बेसबॉल हॉल ऑफ फेम’ कॉपर हाफ डॉलर मिळेल. या सर्व 19 विजेत्यांची निवड ऑनलाइन व्होटिंग पद्धतीने करण्यात आली. मिंटने सुरक्षेच्या कारणास्तव या मुलांची नावे जाहीर केली नाहीत.