आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या युवतीने \'मिरर सेल्फी\'ला दिली नवी ओळख, पाहा सर्वाधिक Creative Selfie

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - सेल्फीबाबत प्रेम म्हणा किंवा वेडेपण. पण 'मिरर सेल्फी' आतापर्यंतचा उत्कृष्‍ट नमुना ठरला आहे.डक फेस, बाथरूम सेल्फी, फेरी टेल्स याबरोबरच तुम्हाला हवे असलेले सेल्फी ही सर्व छायाचित्रे युवतीने आपल्या'मिरर सेल्फी' त समावेश केला आहे.हेलेन मेलडाल्ह हिने 'मिरर सेल्फी' ला पुढील टप्प्यात आणले असून सध्‍या त्याबाबत विशेष चर्चा रंगताना दिसत आहे. नॉर्वेची रहिवाशी असलेली हेलेन आपल्या सेल्फीमध्‍ये रंग-बेरंगी रंग भरताना त्यांचा मास्टरपीसमध्‍ये रूपांतर‍ित करत आहे.

हेलेन व्यवसायाने चित्रकार आहे. ती म‍िरर आणि ख‍िडक्यांना आपला कॅनव्हास बनवते आणि कल्पनांना चित्रात उतरवते. आपल्या या कसबामुळेच ती कधी सुपर मारियो, तर कधी बॅटमॅनचे रूप घेत असते. इंस्‍टाग्राफवर Mirrorsme नावाने हेलेनचे अकाउंट आहे. येथे तिने आपली छायाचित्रे अपलोड केली आहेत. इंस्टाग्राम युजर्स तिच्या क्रिएटिव्ह सेल्फींना खास पसंती देत आहे. यातील काही निवडक सेल्फी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

पुढील छायाचित्रांमध्‍ये पाहा क्रिएटिव्ह मिरर सेल्फी...
(साभार: इंस्टाग्राम)