डकार (सेनेगल)- गेल्या तीन आठवड्यांपूर्वी 200 पेक्षा जास्त मुलींचे दहशतवादयांनी अपहरण केले होते. या अपहरणाची जबाबदारी नायजेरियन इस्लामिस्ट ग्रुप बोको हराम संघटनेचा नेता अबुबाकर शेकाऊ याने स्वीकारली असून त्यांना खुल्या बाजारपेठेत विकण्याची धमकी दिली आहे. त्याने या मुलींना गुलामही म्हटले आहे. या प्रकरणी अमेरिकेवर दबाव वाढत असून अमेरिकेने हस्तक्षेप करावा अशी मागणी अनेक संघटना आणि देशांकडून करण्यात येत आहे.
बोको हरामने अबुबाकर शेकाऊ याचा व्हिडिओ जाहीर केला आहे. त्यात त्याने सांगितले आहे, की पाश्चिमात्य शिक्षण संपायला हवे. या वयाच्या मुलींनी लग्न करायला हवे. त्या माझ्या गुलाम आहेत. मी लग्नात त्यांचे दान करू शकतो. त्यांचे वयाच्या नवव्या वर्षीच लग्न व्हायला हवे होते. परंतु, या मुलींचे 12 वर्षानंतरही लग्न केले जात नाही. हे गैरइस्लामी आहे.
यासंदर्भात नायजेनियाच्या प्रसार माध्यमांना बोको हरामने संदेश दिला आहे. यापूर्वी एक व्हिडिओही पाठविण्यात आला होता. दोन्हीमध्ये एकच संदेश देण्यात आला आहे.
शाळकरी मुलींच्या अपहरणाला नायजेरीया सरकार जबाबदार असल्याचा आरोप मुलींच्या पालकांनी केला आहे. या अपहरणावरून सरकारविरोधी वातावरण तयार होत आहे.
बोको हराम या दहशतवादी संघटनेने पहिल्यांदाच मुलींचे अपहरण दिल्याची कबुली दिली आहे. उत्तर पूर्व नायजेनियाच्या एका शाळेतून या मुलींचे अपहरण करण्यात आले होते. काहींच्या मते मुलींची संख्या 276 वर आहे.
उत्तर नायजेरियात गेल्या पाच वर्षांमध्ये बोको हराम दहशतवादी संघटनेने अनेक हत्याकांड घडवून आणले आहेत. नायजेनियन सरकार अस्थिर करणे आणि जनतेत असंतोष पसरविण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे.
या वर्षाच्या सुरवातील या संघटनेने सुमारे 50 शाळकरी मुलांची अमानुषपणे हत्या केली होती. परंतु, याचे आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांमध्ये पडसाद उमटले नव्हते. शाळकरी मुलींच्या अपहरणाचा बातम्यांनी प्रमुख वृत्तपत्रांचे मथळे गाठले आहेत.
बोको हराम संघटनेचा नेता अबुबाकर शेकाऊ याने दिलेल्या धमकीचा व्हिडिओ बघा पुढील स्लाईडवर