आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nigerian Woman Wins Beauty Pageant Islam\'s Answer To Miss World

नायजेरियन ओबाबियी एशा अजिबोलास ‘वर्ल्ड मुस्लिमाह’चा किताब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वालालम्पूर- इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये बुधवारी मुस्लिम देशातील सौंदर्यवतींचा जणू मेळाचा भरला होता. निमित्त होते वर्ल्ड मुस्लिमाह 2013 स्पर्धेचे. त्यात ओबाबियी एशा अजिबोला या 21 वर्षीय नायजेरियन युवतीने सर्वांना पिछाडीवर टाकून हा किताब पटकावला. स्पर्धेत सहभागी सौंदर्यवतींना अंतिम फेरीच्या तीन दिवसांत भल्या पहाटे प्रार्थनेसाठी एकत्र येण्याची संधी देण्यात आली होती. त्याचबरोबर पवित्र कुराणचे पठण देखील करता आले. अंतिम फेरीत ओबाबियीचे नाव जाहीर करताच तिला आनंदाने रडू कोसळले. विजेत्या ओबाबियीला आता पवित्र मक्का यात्रा व भारत भेटीचीही संधी मिळाली आहे. दुसरीकडे 28 सप्टेंबरला बाली भागात मिस वर्ल्ड स्पर्धा होईल.

पुढील स्लाईड्‍सवर पाहा; कशी झाली निवड आणि स्पर्धेची छायाचित्रे....