आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रात्री चमकणा-या झुडपांच्या लागवडीची योजना वादात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळोखात चमचमणारी झुडपे नजरेला चांगलीच भुरळ पाडतात. त्यामुळे लोकांकडून पैसे गोळा करणा-या वेबसाइट किकस्टार्टवर या झुडपांच्या लागवडीच्या योजनेला जोरदार पाठिंबा मिळाल्यास नवल ते काय! प्रकल्पाने 44 दिवसांत 8433 देणगीदारांकडून 4 लाख 84 हजार डॉलर गोळा केले. अपेक्षित 65 हजारच्या लक्ष्यापेक्षा ही रक्कम सातपट जास्त आहे. बायोल्युमिनेसंट जीवाणू किंवा काजव्यांचे जीन्स वापरून अर्बिडॉप्सीस या चमकणा-या झुडपाची लागवड हे प्रकल्पाचे लक्ष्य आहे. या झुडपाला वनस्पतीशास्त्र प्रयोगशाळेचा उंदीर म्हटले जाते. यानंतर गुलाब लागवडीची त्यांची योजना आहे.

आयोजकांनी पैसे पुरवणा-यांना योगदानाच्या प्रमाणात बी, रोपे व चमकणारे गुलाब देऊ केले होते. अर्थात, किकस्टार्टर नेहमीच म्हणते की, त्यांची साइट उत्पादन विकण्याचा अड्डा नाही. मात्र बहुतांश यशस्वी प्रकल्पांचे देणगीदार या आयोजकांकडे त्यांचे उत्पादन मागतात. मग ती डॉक्युमेंटरीची डीव्हीडी असो, आयपॉड नॅनोनिर्मित घड्याळ असो. शेकडोंनी काळोखात चमकणा-या रोपट्याचे बीजाची मागणी केली.

याचा परिणाम म्हणून 2 सांस्कृतिक गट किंवा जातींमधील संघर्ष उद्भवला आहे. एका बाजूला आयोजक आणि चमकणा-या झुडपांचे समर्थन करणारे तंत्रज्ञ आहेत. ते जग बदलणा-या कल्पनाशक्तीच्या उद्योजकतेच्या बाजूने आहेत. ते कॉम्प्युटर कोड किंवा डीएन सिक्वेन्सिंगसारख्या बौद्धिक संपदेच्या भागीदारीचे समर्थक आहेत. जेणे करून नवनिर्माण अथवा सृजनात इतर लोक गुणात्मक बदल करू शकतील. हा गट 29 लाख डॉलर उभे करणा-या थ्री-डी प्रिंटरसारख्या किकस्टार्टर प्रकल्पाच्या पाठीशी आहे.

दुस-या बाजूला किकस्टार्टरच्या संस्थापकांचे प्रतिनिधित्व करणारे कलाकार आहेत. ते स्थानिक, लहान उद्योजकांना पाठिंबा देतात, तर विध्वंसक तंत्र व ग्लोबल व्यवसायाला विरोध करतात. जेनेटिकली मॉडीफाइड पदार्थ खाण्यालायक अहेत, असे ते मानत नाहीत. ते कॉर्पोरेट मूल्यांच्या विरोधात आहेत. नैसर्गिक शुद्धतेच्या विचारांचे समर्थक आहेत. आतापर्यंत किकस्टार्टरमध्ये दोन्ही गट सोबत चालत होते. तंत्रज्ञांनी बायोटेक फूडचा विरोध करणा-या माहितीपटाविरोधात मोहीम उघडली नाही आणि कलाकारांनी थ्री-डी प्रिंटिंगचा विरोध नाही केला. झुडपांच्या प्रकल्पाचा मुद्दा आला तेव्हा बायोटेकविरोधी गटांनी प्रकल्पाला जेनेटिक प्रदूषण म्हटले. निधीत पाच टक्के भागीदारी असलेली किकस्टार्टरने चमकणा-या झुडपांचा प्रकल्प थांबवला तर नाही, मात्र जेनेटिकली मॉडीफाइड पदार्थांचा पुरस्कृत करणे बंद केले.