आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nineteen Firefighters Dead In Wildfire In Central Arizona In Us

अमेरिकेत पेटला सर्वात मोठा वणवा, अग्निशमक दलाचे 19 जवान ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या सेंट्रल अ‍ॅरिझोना प्रांतातील जंगलात पेटलेल्या वणव्याने रविवारी रौद्र रुप धारण केले आहे. दोन हजार एकर परिसरात ही आग पसरली आहे. सेंट्रल अ‍ॅरिझोना प्रांतातील एका गावाचा आर्धा भाग आगीच्या भक्षस्थानी पडला आहे. यारनेल हिल भागात आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत असलेले अग्निशमक दलाचे 19 जवान मृत्यूमुखी पडले आहेत.

अ‍ॅरिझोना प्रांताचे गव्हर्नर जॉन ब्रेवेर यांनी रविवारी उशिरा रात्री निवेदन जारी केले. या वनव्यात एका गावाचा आर्धा भाग भस्मसात झाला आहे. 200 हून अधिक जवान आगीवर नियंत्रण आणण्यासाठी झटत आहेत. मात्र, वणवा पसरतच चालला आहे.

दक्षिण अफ्रिकेच्या दौ-यावर असलेलेल अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आगीमध्ये ठार झालेल्या जवानांबद्दल सद्भावना व्यक्त केल्या आहेत.