आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nintee Years Old Cut Hole Yours 1497 KM Distance

नव्वद वर्षांच्या ‘तरुणा’ने सायकलवर कापले 1497 किमी अंतर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - अवघे नव्वद वर्षे वय असलेल्या एका अमेरिकी ‘तरुणा’ने केंटुकी ते फ्लोरिडा हे 1497 किलोमीटर अंतर सायकलवरून पार करून धाडसाला वयाचे बंधन नसते, हे सिद्ध करून दाखवले.


बर्ट ब्लेव्हेनस असे त्या ‘तरुणाचे’ नाव असून त्याने हे अंतर एकवीस दिवसांमध्ये पार केले आहे. प्रवासादरम्यान तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह होता. 1497 किलोमीटर अंतर सायकलवरून पार केल्यानंतर खूप आनंद होत आहे. हा आनंद शब्दांमध्ये सांगता येणारा नाही. एवढे अंतर पार केल्यानंतरही अजिबात थकल्याचे जाणवत नाही. मनाने मी अजिबात थकलो नाही; परंतु शरीरासाठी थोड्या आरामाची गरज आहे, असे ब्लेव्हेनसने म्हटले आहे. वडिलांना प्रवासादरम्यान अनेक जण रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे राहून शुभेच्छा देत होते. पहिल्या टप्प्यापर्यंत मी, तर त्यापुढे बहीण वडिलांबरोबर होती. या वयामध्येही त्यांनी एवढे मोठे अंतर पार करून आश्&९६्न;चर्याचा धक्का दिला आहे, असे ब्लेव्हेनस यांचा मुलगा बेथने सांगितले.