आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Arrest Priminister ;kadri Issue The Arrest Warant

पंतप्रधानांची अटक टळली; कादरीविरुद्ध अटक वॉरंट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अशरफ यांची अटक तूर्त टळली आहे. उर्जा घोटाळ्यात 22 कोटी रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अशरफ यांना अटक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले होते.मात्र कायदयातील तांत्रिक अडचणींमुळे अशरफ यांची अटक सध्यातरी होणार नाही असे दिसत आहे. माहिती मंत्री कमान जमान कैरा यांनी ही बुधवारी सरकारची भूमिका सांगितली.कायदेशीर कारवाई पूर्ण झाल्यानंतरच पंतप्रधानांची अटक शक्य असल्याचे ते म्हणाले. उर्जा घोटाळ्यातील सर्व आरोपींना 24 तासात अटक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले होते.

सार्वत्रिक निवडणूक 15 मे रोजी
रातोरात संसद बरखास्त करण्याची ताहिरुल कादरी यांची मागणी अशरफ सरकारने धुडकावून लावली आहे. संसद आणि प्रांतिक असेंब्लीच्या निवडणूका ठरल्यावेळेप्रमाणे म्हणजे 15 मे रोजी होतील अशी घोषणा बुधवारी पाकिस्तान सरकारने केली. सर्व राजकीय पक्षांनी राष्ट्रीय व प्रांतिक असेंब्लीचा कार्यकाळ 16 मार्च पर्यंत पूर्ण करण्यास सहमती दर्शविली आहे असे माहिती मंत्री कमार झमन कैरा यांनी सांगितले.

कादरीचा अल्टीमेटम
पाकिस्तान सरकारला आव्हान देणारे मौलवी ताहिरउल कादरी यांच्या अटकेचे बुधवारी न्यायालयाने आदेश जारी केले. परंतु पोलिसांना अजुनही गृहमंत्रालयाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. कादरी यांनी सरकारला पायउतार होण्यासाठी बुधवार रात्रीचा अल्टीमेटम दिला कादरी यांच्यासह 70 जणांच्या विरूद्ध कोहसर ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न, पोलिस अधिका-या वर हल्ल्याचा आरोप आहे. या प्रकरणात स्थानिक न्यायाधीशांनी वॉरंट जारी केले.

अशरफ यांच्या अटकेसाठी अडचणी
* उर्जा प्रकल्पातील घोटाळ्यासंबंधीची चौकशी केल्यानंतर सरकारी वकील चौकशी अहवाल नॅशनल अकाउंटीबिलीटी ब्युरोला सादर करणार आहेत.
* अकांउंटीबिलीटी ब्युरो या अहवालाची पडताळणी करुन गुन्हा दाखल करण्याबाबत विचार करेल.
*ब्युरोकडून मंजुरी मिळाल्यानंतर न्यायालय अटकेचा आदेश जारी करेल. न्यायालयात अटकपूर्व जामीन न मिळाल्यास अटकेची कारवाई होईल.

कादरी यांचे इमरान खानला आमंत्रण
आपल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी कादरी यांनी तेहरिक ए-इन्साफ पार्टीचे नेते इमरान खानला आमंत्रण दिले. कादरी म्हणाले तर आपण त्यात सहभागी होऊ, असे इमरानने मंगळवारी म्हटले होते.