आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्‍ट्रीय राजकारण: हल्ला करणार नाही, अमेरिकेची सिरियाने उडवली खिल्ली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन / दमास्कस / कैरो - सिरियावर हल्ला करण्याची घोषणा केल्यानंतर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अचानक एक पाऊल मागे घेतले. लष्करी कारवाईला संसदेची मंजुरी मिळवण्यासाठी ओबामांनी विधेयकाचा मसुदा काँग्रेसकडे पाठवून दिला. या घोषणेनंतर अचानक माघार घेतल्याने सिरियाने खिल्ली उडवली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या 21 तारखेला रासायनिक हल्ल्यानंतर सिरियाला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेने र्मयादित लष्करी कारवाईची तयारी केली. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत रशिया, चीन कारवाईस विरोध करण्याची शक्यता असल्यामुळे एकतर्फी लष्करी कारवाई करण्याची घोषणाही ओबामांनी शनिवारी केली होती. त्यानंतर व्हाइट हाऊसच्या रोझ गार्डनमध्ये त्यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. रासायनिक अस्त्रांवर जगभर बंदी असूनही हा हल्ला करण्यात आला. हा माणुसकीवर हल्ला आहे. त्यामुळे अमेरिकेला लष्करी कारवाई करणे भागच आहे. मात्र या हल्ल्यासाठी मला अमेरिकी लोकप्रतिनिधींची परवानगी हवी आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून लोकप्रतिनिधींनी हल्ल्याच्या विधेयकास मंजुरी द्यावी, असे आवाहन ओबामांनी केले.


काय आहे विधेयकात
हल्ल्यासाठी डेडलाइन नाही : सिरियाविरोधात लष्करी कारवाईसाठी राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिकार बहाल करण्यात यावेत, असे विधेयकात म्हटले आहे. व्हाइट हाऊसने या विधेयकाचा मसुदा काँग्रेसकडे पाठवला आहे.लष्करी कारवाईसाठी यात डेडलाइन देण्यात आलेली नाही. हे विशेष.


9 सप्टेंबरकडे डोळे : काँग्रेसचे कामकाज येत्या सोमवारी, 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे किमान आठवडाभर लष्करी कारवाई होणार नाही, हे आता अटळ आहे.


का घेतला निर्णय : इराक, अफगाणिस्तान परकीय युद्धात शेकडो जवान धारातिर्थी पडले.अर्थव्यवस्थेवर ताण पडला होता. अमेरिकेतही नागरिकांचा हल्ल्यास विरोध होता. शिवाय सिरियातील लष्करी कारवाईस पंतप्रधान डेव्हीड कॅमेरॉन यांना ब्रिटिश संसदेने मंजुरी दिली नव्हती. ब्रिटिश संसदेत कारवाईचे विधेयक फेटाळण्यात आले. त्यामुळे अमेरिकेच्या लढाईस लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्यास चांगले असा विचार ओबामांनी केला. फ्रान्समध्ये बुधवारी या कारवाईसंबंधी संसदेत चर्चा होणार आहे.