आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेकडून नेटयुजर्सच्या माहिती चोरी प्रकरणाशी संबंध नाही; फेसबुकचे स्पष्टीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेची राष्‍ट्रीय सुरक्षा यंत्रणा ‘प्रिझ्म प्रोग्राम’ मार्फत फेसबुक, गुगल आणि याहूच्या सर्व्हरपर्यंत थेट पोहोचून युजर्सबाबत माहिती संकलित करत असल्याची बाब उघड झाल्यानंतर अ‍ॅपलपाठोपाठ आता फेसबुक व गुगलने आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसून, युजर्सची खासगी माहिती कोणालाही उपलब्ध करून दिली नसल्याचा खुलासा केला आहे. अमेरिकी सुरक्षा यंत्रणा मात्र प्रिझ्म प्रोजेक्टचे समर्थन करत आहे. अशा माध्यमातूनच 2009 मध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावल्याचा दावा अमेरिकी गुप्तचर यंत्रणा करत आहेत.
युरोप तसेच अमेरिकेत प्रिझ्म प्रोग्रामबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू असून, भारताशिवाय ब्रिटनसह सर्वच युरोपीय देशांमधील नागरिक आपापल्या देशातील सरकारांवरच संशय घेत आहेत. इंटरनेट तसेच सोशल नेटवर्किंग साइट्सवरील युजर्सची खासगी माहिती सुरक्षा यंत्रणांना पुरवली जात असल्याचा नागरिकांना संशय आहे. मात्र, सर्वप्रथम अ‍ॅपल व त्यापाठोपाठ आता फेसबुक व गुगलनेही इंटरनेटच्या माध्यमातून या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून, आपण सरकारी यंत्रणा किंवा कोणासही माहिती दिली नसल्याचा अधिकृत काय आहे प्रिझ्म
‘वॉशिंग्टन पोस्ट’ ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार अमेरिकेची राष्‍ट्रीय सुरक्षा यंत्रणा आणि एफबीआय या दोन्ही संस्था एका प्रोग्रामच्या माध्यमातून इंटरनेटवर माहिती शोधत आहेत. याच प्रोग्रामला प्रिझ्म असे म्हटले आहे.
युजर्सची माहिती देण्यासंदर्भात न्यायालय किंवा सरकार कोणाचेही काहीही निर्देश नाहीत. असे आदेश मिळाले तरी आम्ही त्याचा कडाडून विरोध करू मार्क जुकरबर्ग, फेसबुक
अमेरिकी सुरक्षा यंत्रणांना थेट आमच्या सर्व्हरपर्यंत पोहोचवतो, अशा कोणत्याही प्रोग्रामबाबत ठाऊक नाही. प्रिझ्म हे नाव तर यापूर्वी कधी ऐकले नाही. लॅरी पेज, गुगल


भारतीय यूजर्सचीही माहिती चोरली
प्रिझ्मअंतर्गत ज्या पाच देशांमधून अमेरिकी यंत्रणेने माहिती घेतली, त्यात भारताचा समावेश आहे. मार्च महिन्यात भारतीय संगणकातून 6.3 अब्ज माहिती घेतल्याचे वृत्त गार्डियन या ब्रिटिश वृत्तपत्राने दिले. इतर देशांमध्ये इराण, पाकिस्तान, जॉर्डन व इजिप्तचा समावेश आहे.