आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Decision Yet On PM Invitation For Modi’S Oath Taking: FO

शपथविधीला शरिफ यांच्या उपस्थितीबाबत अद्याप निर्णय नाही : पाक परराष्ट्र मंत्रालय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ हे उपस्थित राहणार की नाही, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. विविध माध्यमांनी शरिफ यांनी भारताचे आमंत्रण स्वीकारले असून ते मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे वृत्त दिले होते. पण या वृत्तामध्ये तथ्य नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिका-यांनी म्हटले आहे.
भारतीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तांमध्ये 26 मे रोजी होणा-या मोदींच्या शपथविधीसाठी येण्यास नवाज शरिफ यांनी होकार दिल्याचे म्हटले होते. मात्र पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवकत्या तसनीम असलम यांनी गुरुवारी स्पष्ट केले की, याबाबत पंतप्रधानांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. आम्हाला आमंत्रण मिळाले असून, लवकरच त्याबाबतचा निर्णय कळवला जाईल, असेही असलम म्हणाल्या.
परराष्ट्र खात्यातील सुत्रांच्या मते नवाज शरिफ हे या मुद्यावर त्यांच्या सल्लागारांबरोबर चर्चा करणार आहेत. सार्क देशांच्या प्रमुखांना मोदींनी त्यांच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण पाठवले आहे. शेजारी राष्ट्रांच्या प्रमुखांना शपथविधीसाटी बोलावण्याची ही पहिलीच वेळ आहे. अफगाणिस्तान, मालदीव आणि श्रीलंकेतर्फे सोहळ्याला उपस्थित राहण्याबाबत होकार कळवण्यात आला आहे.