आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • No Difference Between Zardari And Bilawal : PPP Comments

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झरदारी-बिलावल यांच्यात मतभेद नाहीत : पीपीपीचा खुलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची - पाकिस्तानचे राष्‍ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि त्यांचा मुलगा बिलावल भुत्तो यांच्यात मतभेद नसल्याचे पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) प्रवक्त्याने सांगितले. झरदारी आणि बिलावल यांच्यात मतभेद नसल्याचे झरदारी यांच्या मुलीने स्पष्ट केले आहे. वडिलांशी मतभेद झाल्याने बिलावल काही दिवसांपूर्वी दुबईत निघून गेल्याचे वृत्त प्रसारमाध्यमात धडकले होते. मलाला युसूफजाई आणि शिया मुस्लिमांवर होत असलेल्या हल्ल्याबाबत बिलावल आणि झरदारी यांच्यात वाद निर्माण झाले होते.

तसेच झरदारी यांची बहीण फरियाल तलपूर यांच्यावरून पिता-पुत्रात मतभेद झाल्याचे वृत्त होते. दोघांच्या वादानंतर पाकिस्तानातील ‘डॉन’ या आघाडीच्या वृत्तपत्राने बिलावल आणि झरदारी यांच्यातील मतभेदांना ठळकपणे स्थान दिले होते. सुरक्षेच्या कारणामुळे बिलावल हे पाकिस्तान सोडून दुबईत गेले आहेत. त्यामुळे त्यांचा झरदारी यांच्याशी काहीही वाद नसल्याचे पीपीपीच्या नेत्या शर्मिला फारुकी यांनी सांगितले.