आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारगिल घुसखोरीची योजनेची आयएसआयला कल्पना नव्हती :परवेझ मुशर्रफ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी कारगिल घुसखोरीची योजना इतकी गुप्त ठेवली होती की पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला त्याची गंधवार्तादेखील नव्हती. आयएसआयने भारतीय सैनिकांचे संदेश पकडल्यानंतर त्यातून त्यांना कारगिल घुसखोरीची माहिती मिळाली.
पाकिस्तानचे निवृत्त लेफ्टनंट जनरल व आयएसआयच्या अ‍ॅनालिसिस विंगचे तत्कालीन प्रमुख शाहिद अजीज यांनी हा खळबळजनक खुलासा केला असून त्यामुळे पाकमध्ये नवे वादंग निर्माण झाले आहे. शाहिद अजीज यांनी त्यांच्या ‘फॉर हाऊ लाँग धिस सायलेन्स’ या नव्या पुस्तकात घुसखोरीचा तपशील दिला आहे. त्यांचे हे पुस्तक गेल्या आठवड्यात प्रकाशित झाले आहे. अजीज यांनी पुस्तकात म्हटले आहे की,भारतीय लष्कराच्या पकडण्यात आलेल्या वायरलेस संदेश 3 किंवा 4 मे 1999 रोजी तत्कालीन आयएसआय प्रमुख झियाउद्दीन बट यांना दाखवण्यात आले होते. त्यातून त्यांना पाकिस्तानच्या दहाव्या तुकडीच्या जवानांनी नियंत्रण रेषेवर आक्रमक कारवाई केल्याची माहिती त्यांना समजली. कारगिल घुसखोरीच्या योजनेत पाकची गुप्तचर संस्था आयएसआयही सहभागी होती, असे म्हटले जात होते. अजीज यांचा दावा ग्राह्य धरला तर त्याला छेद बसतो.
कारगिल ऑ परेशन कशासाठी केले?
* अजीज यांनी त्यांच्या पुस्तकात कारगिल मोहिमेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. हे ऑ परेशन कशासाठी केले गेले? त्याच्यामागे कोणते उद्देश होते की ती केवळ एक चूक होती? या सर्व प्रश्नांची उत्तरे कदाचित गूढच राहतील, असेही अजीज यांनी म्हटले आहे.
*कारगिलचा घटनाक्रम गोपनीय ठेवल्याबद्दलही अजीज यांनी शंका व्यक्त केल्या आहेत. त्यांचे म्हणणे असे की ही बाब पाक सैनिकांची तयारी मर्यादित होती निवडली गेलेली वेळ योग्य नव्हती. त्या परिस्थितीत याचे समर्थन केले नसते. त्यामुळेच ही योजना गुप्त ठेवली गेली असावी.
अजीज यांच्या पुस्तकात हेही आरोप : पाकिस्तानने 1971 च्या युद्धातील तथ्यही दडवून ठेवले. कारगिल युद्धातही हेच झाले. कारगिलसंदर्भात पाक सैन्याची कुठली कमजोरी राहिली, याचा अभ्यास करण्याचा अजीज यांनी प्रयत्न केला. परंतु तो मुशर्रफ यांनी मध्येच थांबवला.
मुशर्रफांसह चार अधिका-यांचा प्लॅन : कारगिलचे संपूर्ण ऑ परेशन व त्याची योजना आखण्यात मुशर्रफ यांच्यासह चार अधिकारी सहभागी होते. अजीज यांनी त्यांच्या पुस्तकात असेही म्हटले आहे की, मी जर या गोष्टींचा खुलासा केला नाही तर देशाचे युवा रक्त युद्धात असेच वाया जाईल.