आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचारवंतांच्या पहिल्या 50 जणांच्या यादीत एकही भारतीय नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - जगभरातील विचारवंतांच्या गटात (थिंक टँक)पहिल्या 50 जणांच्या यादीत एकाही भारतीय संस्थेचा समावेश होऊ शकलेला नाही. दिल्लीतील सेंटर फॉर सिव्हील सोसायटी (सीसीएस) ही 51 व्या स्थानी असून जगातील 150 संस्थांच्या यादीत भारतातील सहा संस्थांचा समावेश आहे.

पेन्सिलव्हानिया विद्यापीठाने जगातील 150 विचारवंतांच्या गटाची यादी तयार केली आहे. त्यात पहिल्या स्थानी बु्रकिंग्स इंस्टिट्यूशन (अमेरिका) ही संस्था आहे. त्यानंतर चॅथम हाऊस (ब्रिटन)व कार्नेगी इंडाऊमेंट फॉर इंटनॅशनल पीस (अमेरिका) यांचा क्रमांक लागतो. यादीत सहभागी इतर भारतीय विचार संस्थांमध्ये इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड अ‍ॅनालिसीस (105 वे स्थान), इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स (आयसीआरआयईआर, 109वे स्थान), द एनर्जी अँड रिसोर्सेस इंस्टिट्यूट (टेरी 110 वे स्थान), ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन (ओआरएफ 115 वे स्थान), डेव्हलपमेंट आल्टरनेटीव्हस (141) यांचा समावेश आहे.

तीन भारतीय विचार गटांनी 100 सर्वोत्तम संस्थांपैकी एक असून या गटात एकाही अमेरिकन संस्थेचा समावेश नाही. पर्यावरणावर आधारित 20 विचारसंस्थांच्या गटात अशोक ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी (एटीआरईई) व सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट (सीएसई) यांचा समावेश आहे.

आशिया गटात भारतचे वर्चस्व
तर ऊर्जा व संशोधन नीतीवर आधारित 20 समुहांच्या गटात एनर्जी अँड रिर्सोसेस इन्स्ट्यिूटला सातवे स्थान मिळाले आहे. भारत, चीन, जपानसह आशियाई देशांच्या संक्षिप्त यादीत ओआरएफ (10)आयडीएसए (11), सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (12), सीसीएस (15), दिल्ली पॉलिसी ग्रुप(22), इंस्टिट्यूट ऑफ कॉनफ्लिक्ट स्टडीज (24), टेरी(25), सेंटर फॉर स्टडीज फॉर एम्प्लॉइड इकॉनॉमिक रिसर्च (29), सेंटर फॉर डेव्हलपिंग सोसायटी(33) आदी संस्थांना स्थान या यादीत मिळाले आहे