आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Indian University To In World Best Universities

जागतिक नावलौकिकात भारतीय विद्यापीठे ‘ढ’; एमआयटी, हॉर्वर्ड अव्वल स्थानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - जगातील आघाडीच्या 200 शैक्षणिक संस्थांमध्ये स्थान मिळवण्यास एकही भारतीय शैक्षणिक संस्था यशस्वी ठरू शकलेली नाही. अमेरिकास्थित मेसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) आणि हॉर्वर्ड विद्यापीठाने या प्रतिष्ठेच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.


भारतातील आघाडीची आणि प्रतिष्ठित समजल्या जाणा-या आयआयटी दिल्लीचे या यादीतील स्थान 212 वरून 222 क्रमांकावर घसरले आहे. मंगळवारी क्यूएस जागतिक विद्यापीठ मानांकन जाहीर करण्यात आले. या यादीत अमेरिकी विद्यापीठांचा वरचष्मा असून एमआयटीने प्रथम तर हॉर्वर्ड विद्यापीठाने दुसरे स्थान पटकावले आहे. ब्रिटनचे केम्ब्रिज विद्यापीठ तिस-या क्रमांकावर फेकले गेले आहे.


800 च्या यादीत 11 आयआयटी
आयआयटीमध्ये प्रवेश मिळणे आणि तेथे शिक्षण घेणे भारतात प्रतिष्ठेचे समजले जाते. जगातील 800 दर्जेदार शैक्षणिक संस्थांच्या यादीत देशातील 11 आयआयटींचा समावेश आहे.


आयआयटींचे मानांकन खालीलप्रमाणे
आयआयटी, दिल्ली 222
आयआयटी, मुंबई 233
आयआयटी, कानपूर 295
आयआयटी, चेन्नई 313
आयआयटी, खरगपूर 346


कसे होते मानांकन?
जगातील 3000 शैक्षणिक संस्थामध्ये शिकवले जाणारे विषय, संशोधनाचे निकाल आणि शैक्षिणक नावलौकिक या बाबी लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर क्यूएस संस्थेकडून मानांकन करण्यात येते. जगातील हे सर्वात मोठे मानांकन समजले जाते.


कैद-ए- आझम उत्कृष्ट
विद्यापीठ मानांकनाच्या यादीत पाकिस्तानच्या कैद- ए- आझम विद्यापीठाने 119 तर इस्लामाबादच्या राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठाने 120 वा क्रमांक पटकावला आहे. या यादीत 140 व्या क्रमांकावर असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या तुलनेत ही दोन्ही विद्यापीठे पुढे आहेत.


आशियात हाँगकाँग अव्वल
आशिया खंडातील आघाडीच्या 50 विद्यापीठांमध्ये हाँगकाँग विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याखालोखाल चीन, जपान आणि कोरियन विद्यापीठांचा क्रमांक लागतो. या यादीत आयआयटी, दिल्लीने 38 वे, आयआयटी, मुंबईने 39 वे स्थान मिळवले आहे.