आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Involvement Of Britain In Operation Blue Star, Said Devid Cameron

ऑपरेशन ब्ल्यू स्टारमध्ये ब्रिटनचा सहभाग नाही,डेव्हिड कॅमेरॉन यांचा खुलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - 1984 च्या भारतातील ऑपरेशन ब्ल्यू स्टारमध्ये तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर सरकारचा सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, असा निर्वाळा ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी दिला आहे. अमृतसरमधील सुवर्णमंदिरातून अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन ब्ल्यू स्टार हाती घेण्यात आले होते.
त्या वेळच्या 200 फायली आणि 23000 कागदपत्रे धुंडाळल्यानंतर ब्रिटनचा या कारवाईत कसलाच सहभाग असल्याचे दिसून आले नाही, असे कॅमेरॉन यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये याबाबत सादर झालेल्या अहवालानंतर शीख समाजासाठी जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. भारतीय लष्कराला कारवाईसाठी सल्ला देण्यासाठी ब्रिटनच्या स्पेशल एअर सर्व्हिसच्या अधिका-याने भारताला भेट दिली होती, असे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले होते. यानंतर
कॅमेरॉन यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. प्रत्यक्ष कारवाईच्या आधी चार महिने ब्रिटिश लष्करी अधिका-याने थोडा सल्ला दिला होता. मात्र, कारवाईमध्ये सल्ल्याचा अवलंब करण्यात आला नसल्याचे कॅमेरॉन यांनी सांगितले. ऑपरेशन ब्ल्यू स्टारमध्ये ब्रिटनच्या कारवाईचे प्रकरण समोर आल्यानंतर आपण तत्काळ चौकशीचे आदेश दिले. मंत्रिमंडळ सचिवांवर याची जबाबदारी टाकली होती. माझ्या मते दोन्ही सरकारे आणि शीख समुदायांमध्ये संवाद सुरूच राहावयाला हवा. या समाजाने देशाच्या विकासात दिलेले योगदान विसरू शकत नाही,असे कॅमेरॉन म्हणाले.