आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरप्रश्नी मध्यस्थीस ब्रिटनचा स्पष्ट नकार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ब्रिटनने काश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्यास नकार दिला असून भारत व पाकिस्तानने काश्मिरी जनतेचे हित लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, असे आवाहन केले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये जन्मलेल्या लॉर्ड नजीर अहमद यांनी बुधवारी रात्री हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये जम्मू-काश्मीरमध्ये जनमत चाचणी घेण्याची मागणी केली. त्याला सरकारने प्रतिसाद दिला नाही.


लॉर्ड अहमद यांनी काश्मीरवरील चर्चेला सुरुवात करत म्हटले की, काश्मीरमधील लोकांना स्वयंनिर्णयाच्या अधिकारासह वादग्रस्त मुद्दे सोडवण्यासाठी भारत व पाकिस्तानमधील शांतता प्रक्रियेचे आपण समर्थन करतो का, असा सवाल उपस्थित केला. अफगाणिस्तानातून आंतरराष्‍ट्रीय समुदाय माघारी परतण्याआधी हा प्रश्न सुटणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. चर्चेला उत्तर देताना परराष्ट्र व राष्ट्रकुल प्रकरणांचे राज्यमंत्री वरोनस वारसी म्हणाले की, भारत आणि पाकिस्ताननेच काश्मीर प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. ब्रिटन किंवा अन्य देश या प्रश्नात हस्तक्षेप करणार नाहीत. दोन्ही देशांनी या प्रश्नातून मार्ग काढावा, ब्रिटन सरकार त्यांना पाठिंबा देईल.