आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Narendra Modi Wave Behind Assembly Election Results, American Expert Claimed

विधानसभा निवडणूक निकालांमागे नरेंद्र मोदींची लाट नाही, अमेरिकन तज्ज्ञांचा दावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारतात नुकत्याच झालेल्या चार राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालांमागे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची लाट असल्याचे संकेत मिळत नाहीत. पुढील वर्षी होणा-या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपचे असेच प्रदर्शन राहील याची खात्रीही नाही, असे निरीक्षण अमेरिकी तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि दिल्लीतील विजयामागे नरेंद्र मोदी हा एकटा फॅक्टर कारणीभूत नाही. भाजप संबंधित राज्यांमध्ये तुल्यबळ प्रतिस्पर्धी राहिला आहे. या वेळीच्या निकालात 2003 च्या निवडणुकीचे प्रतिबिंब उमटले आहे, असे मॅकलार्टी असोसिएट्सच्या दक्षिण आशिया विभागाचे संचालक रिचर्ड एम. रोसोव यांनी सांगितले. भाजप आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यातील लोकसभेच्या किती जागा जिंकतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे. गेल्या दोन निवडणुकीत भाजपला केवळ एकच जागा जिंकता आली, असे रोसोव म्हणाले.
प्रत्येकाचे वेगवेगळे असेल मात्र, संबंधित राज्यांत मोदींची लाट होती हे सिद्ध करू शकणारा सबळ पुरावा नाही, असे रोसोव म्हणाले. मात्र, पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोदी यांनी पहिली चाचणी उत्तीर्ण केल्याचे अमेरिकन एन्टरप्राइज इन्स्टिट्यूटचे सदानंद धुमे म्हणाले. मोदी यांचा कितपत उपयोग झाला हे सांगणे कठीण असल्याचे ते म्हणाले.