आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Nukes ! Japanese Citizen Opposing And Come In Road

नो न्यूक्स ! जपानमध्ये संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - फुकूशिमाच्या घटनेची जखम ताजी असताना पंतप्रधान शिंझो अबे यांनी अणु प्रकल्प सुरू करण्याचे संकेत दिल्यामुळे जपानमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. रविवारी हजारो संतप्त नागरिकांनी राजधानीत सरकारच्या विरोधात निदर्शने केली.


टोकियोमधील सिटी सेंटर भागात हजारो आंदोलक एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. सरकारने आपला विचार बदलावा, अशी मागणी निदर्शकांकडून करण्यात आली. फुकूशिमा येथील किरणोत्सर्गाची शिकार झालेल्या नागरिकांचाही निदर्शकांमध्ये समावेश असल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर सेलिब्रिटीही निदर्शनात उतरले होते. साहित्यातील नोबेल मिळवणारे केंझाबुरो ओइ यांनीही आंदोलनात सहभागी होत नागरिकांच्या मागणीचे समर्थन केले. ‘नो न्यूक्स !’ असे फलक निदर्शकांच्या हाती दिसून येत होते. फुकूशिमाचे संचालन करणा-या इलेक्ट्रिक पॉवर कंपनीच्या टोकियोतील कार्यालयासमोर हा मोर्चा नेण्यात आला. कंपनीच्या मुख्यालयासमोर नागरिकांनी नारेबाजी करत प्रकल्प सुरू करू नये, अशी मागणी केली.


उद्योगपतींसाठी खटाटोप : अणु प्रकल्प सुरू करण्यास देशभरातील नागरिकांकडून विरोध होत असला तरी सुरू करण्याच्या सरकारच्या खटाटोपामागे उद्योगपती कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. पंतप्रधान शिंझो अबे यांच्या लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे देशातील बळकट अशा उद्योग वर्तुळाशी घनिष्ठ संबंध आहेत. अणु प्रकल्पासाठी आवश्यक असणारी सुरक्षेची हमी मिळाली तर ते सुरू करण्यास काहीच हरकत नसल्याचे अबे यांचे म्हणणे आहे.


सिटी सेंटर भागात हजारो आंदोलक
चेर्नोबेल दुर्घटनेमुळे भीती
1986 मध्ये टोकियोच्या ईशान्येला असलेल्या चेर्नाेबेलमधील अणु ऊर्जा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्ग झाला होता. हा किरणोत्सर्ग 220 किलोमीटर अंतरावर राजधानीच्या शहरापर्यंत पसरला होता. या दुर्घटनेची आठवण अजूनही ताजी असल्याने नागरिकांच्या मनात भीती दिसून येते.


7,500 नागरिक टोकियोत रस्त्यावर
50 अणु भट्ट्या सुरक्षेस्तव बंद.