आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्यार्थी आणि मलाला यांना नोबेल पुरस्कार प्रदान, जगात गुंजला शांततेचा आवाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओस्लो - भारताचे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसूफझाई यांना बुधवारी शांततेसाठी नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार संयुक्त रूपाने मिळाला आहे. या प्रसंगी सत्यार्थी म्हणाले, जी हजारो मुले स्वतंत्र झाली, अशा मुलांचे मला या क्षणी स्मरण होत आहे. त्यांना स्वतंत्र करताना मी स्वत:ची मुक्ती अनुभवत आलो आहे. मुक्तीच्या पहिल्या हास्यपूर्ण लोभस चेह-यांमध्ये मी सदोदित ईश्वराचे हास्य पाहत आलो आहे.

१७ वर्षांची मलाला सर्वात कमी वयाची नोबेल पुरस्कार विजेती ठरली आहे. भारतातील प्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अमजद अली खान आणि पाकिस्तानचे गायक राहत फतेह अली खान यांनी या प्रसंगी कला सादर केली. सत्यार्थी आणि मलाला महात्मा गांधी यांच्या तत्त्ाज्ञानाने वाटचाल करतात. दोघेही शांततेचे सर्वात मोठे योद्धे ठरतात, अशा शब्दांत नोबेल समितीचे प्रमुख थार्बजॉन जॅगलँड यांनी विजेत्यांचा गौरव केला.

भाषणातील मुद्दे
- शांती आणि नैतिकतेच्या पवित्र मंचावर वेदमंत्राचे उच्चारण करताना मी गौरवान्वित झालोय.
- आंदोलनातील कालू कुमार, घुमदास आणि आदर्श किशोर तसेच पाकिस्तानातील इक्बाल मसीह यांना सन्मानाचे श्रेय देतो. त्यांनी मुलांच्या स्वातंत्र्यासाठी, सन्मानासाठी सर्वोच्च बलिदान दिले.
-मुलांना प्रगतीसाठी स्वातंत्र्य असले पाहिजे. जेवण, झोप, सूर्यदर्शन करण्याचे स्वातंत्र्य हवे.