आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nobel Peace Prize To Kailash Satyarthi & Malala Yusufzai #NobelPeacePrize

यंदाचा शांततेचा नोबेल भारताचे कैलास सत्यार्थी तर पाकिस्तानच्या मलाला युसूफजईला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओस्लो - यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार भारतातील सामाजिक कार्यकर्ते कैलास सत्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसूफजई यांना घोषित करण्यात आला आहे. कैलास सत्यार्थी 'बचपन बचाओ' नावाची एक बिगर सरकारी संस्था चालवतात. ही संस्था बालमजुरीच्या विरोधात काम करते. मलाला युसूफजई हिला पाकिस्तानच्या मागास भागांत मुलींच्या शिक्षणाचा विडा उचलल्यामुळे कट्टरतावाद्यांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागले होते. त्यानंतरही मलालाने तिचे कार्य सुरुच ठेवले.
बालके आणि तरुणांच्या जीवनातील समस्या कमी व्हाव्यात आणि त्यांच्या जीवनात बदल घडावा म्हणून केलेले शैक्षणिक कार्य याचा विचार करून या दोघांना गौरवण्याचा निर्णय पुरस्कार समितीने घेतला आहे.
कैलास सत्यर्थी यांनी स्वतःच्या फायद्यासाठी लहान मुलांचा वापर करून घेणा-यांच्या विरोधात महात्मा गांधीजींच्या शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने आंदोलन छेडलेले आहे. त्यासाठी सत्यार्थी यांनी अनेक आंदोलने केली आहेत. तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून लहान मुलांना बालमजुरीपासून बचाव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही बालमजुरांच्या संरक्षणासाठी आचारसंहिता तयार करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान होते.

तरुणांचे विषय मांडण्यापूर्वी मलाला यूसूफजई यांनी अनेक वर्षे मुलींच्या शिक्षणासाठी लढाई लढली आहे. तरुण स्वतः त्यांच्या हक्कांसाठी लढून बरेच काही बदल घडवून आणू शकतात याचा वस्तुपाठ मलाला यांनी घालून दिला आहे. विशेष म्हणजे मलाला यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये सर्वकाही करून दाखवले आहे. या नीडरपणे केलेल्या परिश्रमामुळे मलाला मुलींच्या शिक्षणासाठी लढणारा आंतरराष्ट्रीय चेहरा ठरली आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, कोण होते सत्यार्थी...