आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमाविषयी शेखी मिरवणारे आता फेसबुकवर अनफ्रेंडच्या यादीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - प्रेमाविषयी शेखी मिरवणा-यांचे आतापर्यंत निभावून गेले. परंतु फेसबुकवर सध्या मात्र नवा ट्रेंड आला आहे. रोमान्सबद्दलच्या अपडेट सांगून पिडणा-यांना अनफ्रेंडच्या यादीत ढकलण्यात येत आहे. आपल्या जोडीदाराबद्दलचे खासगी प्रसंग जाहीर करणा-या प्रेमबहाद्दरांना बेदखल करण्याचे प्रमाण सोशल नेटवर्किंगवर वाढल्याचे दिसते.

ब्रिटनमध्ये प्रेमलीला जाहीर करण्याची पद्धत आहे. त्यात सातत्याने मेसेज किंवा फोटो पोस्ट केले जातात. त्यामुळे साहजिकच रस नसणा-यांना ही गोष्ट पिडणारी ठरली. म्हणूनच 68 टक्के युजर्सनी अशा मित्रांना मैत्रीच्या नात्यातून बेदखल केल्याचे कबूल केले. काही लोकांची वाईट भाषाही त्यांना अनफ्रेंड करण्यास कारणीभूत ठरली. काही मंडळी तर स्वत:हून इतरांच्या आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न करत होती. अशा मंडळींनाही अनफ्रेंड करण्यात आल्याचे दिसून आले.