आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • North Korea Celebrates As Entire World Is In Fear Of Nuclear Attack

उत्तर कोरिया मजेत, दक्षिणेत तणाव, 15 एप्रिल ‘डेंजर डेट’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्योंगयोंग, सेऊल, वॉशिंग्टन - क्षेपणास्त्र हल्ल्याचा गलबला करून कोरियन बेटासह अवघ्या जगाची झोप उडणाºया उत्तर कोरियात राष्ट्रीय सुटी आणि जल्लोष सुरू आहे. विशीतील तरुण नेते किम जोंग उन यांच्या राज्याभिषेकाच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त राजधानी प्योंगयोंगसह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे किम जोंग यांचे आजोबा किम इल संग यांची येत्या सोमवारी (15 एप्रिल) जयंती असून त्या दिवशी उत्तर कोरिया हल्ला करू शकते अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

उत्तर कोरियात एकीकडे जल्लोष सुरू असताना त्यांची संभाव्य क्षेपणास्त्र चाचणी आणि अमेरिकी लष्करी तळ गुआमवर हल्ल्याच्या भयाने दक्षिण कोरिया, अमेरिकेचे धाबे दणाणले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी चार दिवसांच्या पूर्व आशिया दौºयावर निघाले आहेत. शुक्रवारी ते सेऊलमध्ये दाखल झाले. दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षा पार्क जेऊन -हे यांची ब्लू हाऊस या राष्ट्राध्यक्षीय प्रसादामध्ये केरी यांनी भेट घेतली. त्याचबरोबर कोरियन संरक्षण अधिकाºयांशीही चर्चा केली. उत्तर कोरियाच्या धमकीनंतर अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त लष्करी कवायती सुरूच आहेत. उत्तर कोरियाला गप्प करण्यासाठी अमेरिका चीनवरही दबाव आणत आहे. त्याचाच एक भाग म्हणून केरी चीनलाही भेट देणार आहेत.

क्षेपणास्त्रावर लादता येणारी अण्वस्त्रे
उत्तर कोरियाकडे जमिनीवरून जमिनीवर मारा करता येणा-या क्षेपणास्त्रांवर लादता येऊ शकतील अशी अण्वस्त्रे आहेत, अशी पक्की खबर संरक्षण गुप्तचर संस्थेला (डीएसए) लागल्याचा दावा गुरुवारी अमेरिकेचे संसद सदस्य डग लम्बॉर्न यांनी के ला. त्यांच्या दाव्यामुळेच उत्तर कोरियाच्या हल्ल्याबद्दल नव्याने तर्कवितर्क सुरू झाले आहेत. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने या दाव्यास दुजोरा दिला. मात्र, तरीही उत्तर कोरियाकडे अशा प्रकारची क्षेपणास्त्रे असतील यावर त्यांचा विश्वास नाही.

दक्षिणेला संशय
उत्तर कोरियाकडे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे नाहीत याबद्दल दक्षिण कोरियाला पक्की खात्री आहे. उत्तर कोरियाने तीन अणुचाचण्या घेतल्या ख-या, पण त्यांच्याकडे लहान अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे असतील याबद्दल शंका आहे, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. अण्वस्त्रे वाहू शकतील अशा प्रकारची यंत्रणा निर्मिती करण्याइतपत त्यांची तयारी असू शकेल, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.