आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • North Korea Chief Kim Jong Asks Military To Prepare For War

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर कोरियाने अमेरिकेच्‍या लष्‍करी तळाच्‍या दिशेने सज्‍ज केली क्षेपणास्‍त्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्‍योंग्‍यांग- उत्तर कोरियाने अमेरिकेसोबत युद्धाची तयारी सुरु केली आहे. गुरुवारी मध्‍यरात्रीनंतर उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्‍या सीमेजवळ अमेरिकेच्‍या लष्‍करी तळाच्‍या दिशेने क्षेपणास्‍त्र आणि रॉकेट लॉंचर्स तैनात केले आहेत. उत्तर कोरियाने या रॉकेट युनिटला कोणत्‍याही क्षणी हल्‍ल्‍यासाठी तयार राहण्‍याचे आदेश‍ दिले आहेत.

उत्तर कोरियामध्‍ये आज किम जोंग यांच्‍या समर्थनासाठी हजारो लोक एकत्र येत असून एक भव्‍य रॅली काढण्‍यात येणार आहे. ही सर्व युद्धाची पार्श्‍वभूमि तयार करण्‍याची तयारी दर्शवित आहे.

उत्तर कोरियाने रॉकेट युनिटला लांब पल्‍ल्‍याची क्षेपणास्‍त्रे सज्‍ज ठेवण्‍याचे आदेश दिले आहेत. याशिवाय मोठ्या संख्‍येने सैनिक आणि लष्‍करी वाहनेही तैनात केली आहेत. अमेरिकेच्‍या लष्‍करी तळाच्‍या दिशेने सर्व क्षेपणास्‍त्रे वळविली आहेत. हा निर्णय किम जोंग यांनी सैन्‍याच्‍या वरिष्‍ठ अधिका-यांसोबत चर्चा केल्‍यानंतर घेतला. त्‍यांनी सांगितले की, अमेरिकेसोबत हिशोब चुकता करण्‍याची वेळ आली आहे.

अमेरिकेने गुरुवारी दक्षिण कोरियातून दोन अण्‍वस्‍त्रसज्‍ज लढाऊ विमानांचे उड्डाण केले होते. सैनिकी सराव म्‍हणून या विमानांना उडविण्‍यात आले होते. तसेच अमेरिका लांब पल्‍ल्‍याच्‍या मोहिमेतही यशस्‍वीपणे सहभाग घेऊ शकतो, असेही दाखवायचे होते. यास उत्तर कोरियाने गांभीर्याने घेतले.