आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • North Korea First Attack On Tokyo In War Situation

उत्तर कोरि‍याककडून पुन्हा धमकी; टोकिओला सगळ्यात आधी करणार \'टार्गेट\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिओल/वॉशिंग्टन- कोरियन द्वीपकल्पात युद्धाचे ढग अधिक गडद झाले असताना उत्तर कोरि‍याने शुक्रवारी पुन्हा एकदा जपानवर हल्ल्या करण्याची धमकी दिली आहे. युद्ध सुरु झाल्यानंतर जपानची राजधानी टोकिओला सगळ्यात आधी टार्गेट केले जाणार असल्याचाही इशारा उत्तर कोरियाने दिला आहे.

उत्तर कोरियाने आपले आडमुठे धोरण कायम ठेवले आहे. जपानवर अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. 'कोरि‍यन सेंट्रल न्‍यूज'नुसार उत्तर कोरियाने इशारा दिला आहे की, क्षेपणास्त्र चाचणीत अडथळा निर्माण केल्याचे त्याचे परिणाम वाईट होतील, असा सज्जड इशारा देऊन धमकावले आहे. उत्तर कोरि‍याने 1800 ते 2180 कि‍लोमीटर पर्यंत मारा करणारे 'मुसुडन' क्षेपणास्त्र तैनात केले आहे.

अमेरि‍कन गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार उत्तर कोरि‍याकडे अत्याधुनिक क्षेपणास्त्र असून त्यावर अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. अमेरि‍केचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सांग‍ितले की, त्यांना युद्ध नको आहे. परंतु अमेरि‍का देशातील जनतेचे रक्षण करण्यासाठी अखेर कोणतेही पाऊल उचलू शकते. जगभरातील अन्य देशांप्रमाणे उत्तर कोरियानेही आपली जबाबदारी सांभाळून नियमाचे पालन करावे. उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र हल्ला होण्याची 80 टक्के शक्यता असल्याचे चीनमधील वि‍शेषज्ज्ञांनी सांगितले आहे.

याआधी उत्तर कोरियाने अमेरिकेवर हायड्रोजन बॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिली होती. उत्तर कोरियाकडे हायड्रोजन बॉम्ब आहे किंवा नाही हे मात्र समजू शकलेले नाही. हायड्रोजन बॉम्ब हा अणु बॉम्बच्या तुलनेत एक हजार पटींनी अधिक शक्तिशाली असतो.

उत्तर कोरियाकडून हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेता जपाननेही टोकोओमध्ये दोन पॅट्रियट क्षेपणास्त्र सज्ज ठेवले आहेत. जपानने ओकिनावा द्वीप समूहावरही पॅट्रियट मिसाइल सज्ज ठेवले आहे.

जमिनीवरून हवेत मारा करणारे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र आहे. टोकिओमधील तीन कोटी जनतेच्या सुरक्षिततेसाठी हे क्षेपणास्त्र सज्ज ठेवण्यात आले असल्याचे जपान संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करा....