आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर हल्ल्यांमुळे ५७५ अब्ज रुपयांचा अर्थकारणाला तोटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकन फिल्म स्टुडिओ सोनीवर उत्तर कोरियन हॅकर्सचा हल्ला हॉलीवूडच्या एखाद्या रोमांचक चित्रपटाच्या स्क्रिप्टपेक्षा कमी नव्हता. उत्तर कोरियन हुकूमशहा किम जोंग उन यांच्या हत्येच्या षड्यंत्रावर सोनीवरील चित्रपट-द इंटरव्यू -च्या विरोधात हॅकर्सनी स्टुडिओचे कॉम्प्युटर नेटवर्क उद‌्ध्वस्त करून टाकले. या घटनेने सायबर सुरक्षेवर लक्ष ठेवण्याची गरज वाटू लागली.

सायबर सिक्युरिटी फर्म क्राउडस्ट्राइकचे दिमित्री अल्परोविच म्हणतात, कोणताच उद्योग अशा हल्ल्यांपासून बचाव करू शकत नाही. सोनी हॅकचा तपास करणारी सिक्युरिटी फर्म फायरआयने गेल्या सहा महिन्यांत १२०० बँका, सरकारी संस्था आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांचा अभ्यास केला. त्यातून ९७ टक्के कंपन्या कधी काळी हॅकर्सच्या निशाण्यावर आल्या आहेत. एफबीआयच्या एका मोठ्या अधिकार्‍याने डिसेंबरमध्ये अमेरिका सिनेटच्या एका पॅनलला सांगितले, सोनीवर झाला तसा हल्ला ९० टक्के कार्पोरेशन्सच्या सिक्युरिटीपासून वाचू शकला असता.

या हल्ल्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेला दरवर्षी ५७५ अब्ज डॉलर तोटा होत आहे. बँका, तंत्रज्ञान संस्था आणि रिटेलर्सच्या हॅकिंगमुळे लाखो ग्राहकांचे क्रेडिट कार्ड धोक्यात आले आहेत.

काही सायबर हल्ल्यांचा उद्देश हेरगिरी आहे. न्याय विभागाने चिनी लष्कराच्या पाच हॅकर्सना यूएस स्टील आणि अल्कोआची सिस्टिम उद‌्ध्वस्त करण्यात दोषी मानले आहे. त्याचा ७ कोटी ६० लाख ग्राहकांवर परिणाम होऊ शकतो. उत्तर कोरियाने सोनीच्या हॅकिंगशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. तरीदेखील २०१३ मध्ये दक्षिण कोरियाच्या बँकांमध्ये हॅकिंगसारखी पद्धत सोनीवरील हल्ल्यात दिसून येतो. काही विश्लेषक म्हणतात,सोनी सोपे सावज राहिले असेल. अनेक माजी कर्मचार्‍यांनी सुरक्षाव्यवस्थेत ढिलाई असल्याचा आरोप करून कंपनीविरुद्ध खटला भरला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, आगामी काही वर्षांपर्यंत हॅकर्सचे पारडे जड राहील.