आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • North Korea Made Duplicate Of Apple IPhone, Pyongyang Touch

उत्तर कोरियाने बनविला \'आयफोन\'चा डुप्लिकेट, लोगो बदलून विकतात चायना मोबाईल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्योंगयांग- हुकुमाशाही फर्मान सोडण्यात संपूर्ण जगात कुप्रसिद्ध असलेल्या उत्तर कोरियाने 'अॅपल आयफोन'चा डुप्लिकेट स्मार्टफोन तयार केला आहे. 'प्योंगयांग टच' नामक हा फोन 'आयफोन-3'ची हुबेंहुब कॉपी आहे.

प्योंगयांगमध्ये हा स्मार्टफोन तीन रंगात उपलब्ध आहे. इंटरनेट वगळता या फोनमधील सर्व फीचर्स आयफोन सारखीच आहेत. सेंसरशिप कायद्यानुसार या फोनवरून इंटरनॅशनल कॉल करता येणार नाही.

दरम्यान, 2008 मध्ये कम्युनिस्ट डिक्टेटरशिप असलेल्या देशात 3G नेटवर्क सुरु झाले होते. त्यानंतर या देशात मोबाईल युजर्सच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली होती. सध्या ही संख्या 20 लाखांवर पोहोचली आहे.

'प्योगयांग टच'मध्ये कोणते तंत्रज्ञान वापरले आहे, याबाबत अद्याप कंपनीने खुलासा केलेला नाही. मात्र, या स्मार्टफोनची काही छायाचित्रे जापानी वृत्तपत्र 'चोसुन सिन्बो'मध्ये प्रसिद्ध झाली आहेत.

'चोसुन सिन्बो'च्या वृत्तानुसार, प्योगयांग स्मार्टफोनमध्ये गुगुल अँड्राइड ऑपरेटींग सिस्टमचे मॉडिफाइड व्हर्जन वापरण्यात आले आहे. पिंक, नेव्ही ब्यू आणि व्हाईट कलरमध्ये हा फोन उपलब्ध करून देण्यात आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, चायन मोबाईलचे लोगो बदलून विक्री करतोय उत्तर कोरिया...