आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • North Korea Ready To Wage The War Against America And South Korea

उत्तर कोरियाची अमेरिका व दक्षिण कोरियाविरुद्ध युद्धाची तयारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - उत्तर कोरियाने अमेरिका आणि दक्षिण कोरियाविरुद्ध युद्धाची जय्यत तयारी केली आहे. आपली क्षेपणास्त्रे या देशाने सज्ज केली असून प्रशांत महासागरातील अमेरिकी लष्करी तळांच्या दिशेने काही क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत.


दरम्यान, अमेरिकेची दोन बॉम्बफेक करणारी विमाने उत्तर कोरियाच्या हद्दीतून गेल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. ही स्टील्थ विमाने रडारच्या माध्यमातूनही पकडली जाऊ शकत नाहीत. यानंतर उत्तर कोरियाचे नेते किम जोंगउन यांनी रात्रीतून लष्करी कमांडर्सची बैठक बोलावून निर्माण झालेल्या परिस्थितीवर
चर्चा केली. यानंतर तत्काळ क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली. शिवाय हल्ल्याच्या तयारीत राहण्यासंबंधी आदेशांवर स्वाक्ष-या करण्यात आल्या. सरकारी वृत्तसंस्थेनुसार किम यांनी म्हटले आहे की, आता अमेरिकेचा हिशेब चुकता करण्याची वेळ आली आहे.


दरम्यान, रशियाने उत्तर कोरियाची बाजू घेत अमेरिका या देशाविरुद्ध एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप केला आहे. यामुळे तणाव आणखी वाढेल, असा इशारा रशियाने दिला आहे. यावर द्विपक्षीय चर्चा व्हावी, असा सल्ला दिला.