आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • North Korea Seen Readying For Fourth Nuclear Test: Media Report

उत्तर कोरियाच्या लष्करी कुत्र्यांनी दक्षिण कोरियाच्या संरक्षणमंत्र्यांचे तोडले \'लचके\' !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र हल्ल्याची धमकी दिल्यानंतर एक व्हिडिओ प्रसृत केला आहे. हा व्हिडिओ पाहून दक्षिण कोरिया संतप्त झाला तर नवल वाटायला नको. या व्हिडिओमध्ये उत्तर कोरियाचे लष्करी कुत्रे दक्षिण कोरियाचे संरक्षणमंत्री किम क्वान-जिन यांच्या पुतळ्याचे लचके तोडताना दिसत आहेत. त्यासोबतच लष्करातील सैनिक शुटिंगच्या सरावासाठी टारगेट म्हणूनही किम क्वान-जिन यांच्याच पुतळ्याला लक्ष्य करत आहेत.

उत्तर कोरियाने प्रसृत केलेल्या व्हिडिओमध्ये जर्मन शेफर्ड लष्करी कुत्रे दक्षिण कोरियाचे संरक्षणमंत्र्याच्या पुतळ्यावर तुटून पडले आहेत. हा व्हिडिओ अशा वेळेस आला आहे, जेव्हा दोन्ही कोरियांच्या तणावापासून स्वतःला वाचवण्यासाठी अमेरिकेने क्षेपणास्त्र चाचणी स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. तज्ञांचे मत आहे की, उत्तर कोरियया अमेरिका आणि दक्षिण कोरियाला चिथावणी देण्यासाठी जाणिवपूर्वक असे कृत्य करीत आहे.

उत्तर कोरिया आणि अमेरिकेत दिवसेंदिवस तणाव वाढत चालला आहे. उत्तर कोरियात युद्धाची जय्यत तयारी सुरू आहे. लष्कर युद्धाभ्यासात व्यस्त आहे.