आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • North Korea Threatens America, Japan Ready With Missiles

उत्तर कोरिया अमेरिकेवर करणार हायड्रोजन बॉम्बचा हल्ला; जपानचे क्षेपणास्त्र सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिओल/प्‍योंगयांग/टोकिओ- उत्तर कोरियाविरुद्ध अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात निर्माण झालेले युद्धाचे सावट दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसत आहे. अमेरिकेवर हायड्रोजन बॉम्बचा हल्ला करण्याची धमकी उत्तर को‍रियाने दिली आहे. उत्तर कोरियाकडे हायड्रोजन बॉम्ब आहे किंवा नाही हे मात्र समजू शकलेले नाही. हायड्रोजन बॉम्ब हा अणु बॉम्बच्या तुलनेत एक हजार पटींनी अधिक शक्तिशाली असतो.

उत्तर कोरियाकडून हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेता जपाननेही टोकोओमध्ये दोन पॅट्रियट क्षेपणास्त्र सज्ज ठेवले आहेत. जपानने ओकिनावा द्वीप समूहावरही पॅट्रियट मिसाइल सज्ज ठेवले आहे.

जमिनीवरून हवेत मारा करणारे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र आहे. टोकिओमधील तीन कोटी जनतेच्या सुरक्षिततेसाठी हे क्षेपणास्त्र सज्ज ठेवण्यात आले असल्याचे जपान संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी सांगितले की, देशातील जनतेला सुरक्षित ठेवणे हे आम्ही आमचे आद्य कर्तव्य समजतो. जनतेच्या सुरक्षेला आम्ही प्राधान्य क्रम दिला आहे. यासाठी आम्ही काही पण करायला तयार आहे. उत्तर कोरियावर आम्ही विश्वास ठेऊ शकत नाही. उत्तर कोरिया आमच्यावर केव्हाही हल्ला चढवू शकतो. उत्तर कोरियाने मध्यम-रेंजचे दोन क्षेपणास्त्र सज्ज ठेवल्याचाही इशारा गुप्तचर खात्याने दिला आहे. येत्या 15 एप्रिलपूर्वी उत्तर कोरिया क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची शक्यता आहे. उत्तर कोरियाचे दिवंगत नेता किम इल-सुंग यांची 15 एप्रिलला जयंती आहे.