आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • North Korea Threatens America, Japan Ready With Missiles

अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीने जगाला हदरवून उत्तर कोरिया नाच-गाण्यात मग्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्योंगयांग - दक्षिण कोरिया आणि अमेरिकेवर हल्ल्याची धमकी देवून जगाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असलेल्या उत्तर कोरियात सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. येथील महिला एकत्र येऊन नृत्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत.

उत्तर कोरियात राहात असेलेल्या दक्षिण कोरियाच्या नागरिकांना देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दक्षिण कोरियावर कोणत्याही क्षणी अण्वस्त्र हल्ला केला जाण्याची धमकी उत्तर कोरियाने दिली आहे. उत्तर कोरियाचे राष्ट्रपती असलेल्या किम जांग उन यांच्या सन्मानार्थ आयोजित नृत्याच्या कार्यक्रमानंतर ही धमकी देण्यात आली आहे. या समारंभासाठी महिला नटून-थटून रंगित वस्त्र परिधान करून आल्या होत्या. मजूर पक्षाच्या स्मरणार्थ तयार करण्यात आलेल्या स्मारकाजवळ या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, कम्युनिस्ट सरकारने युद्धाचा इशारा देताना म्हटले आहे की, दक्षिण कोरियातील परदेशी नागरिकांना इजा पोहोचवण्याची आमची इच्छा नाही. त्यामुळे त्यांनी तत्काळ दक्षिण कोरिया सोडावा. मंगळवारी उत्तर कोरियाने स्पष्ट केले की, कोरिया द्विपावर युद्धाची तयारी जोरात आहे. या युद्धात अण्वस्त्र हल्ला देखील होऊ शकतो.