आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • North Korea Threatens Nuclear Strike On White House And Pentagon

उत्तर कोरियाने दिली व्हाईट हाऊस आणि पेंटागॉनवर अणुहल्ला करण्याची धमकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल : उत्तर कोरियाच्या लष्करातील एका उच्चाधिका-याने व्हाईट हाऊस आणि अमेरिकेचे लष्करी तळ असणा-या पेंटागॉनवर अणुहल्ला करण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेने कोरियन द्विपकल्पावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण केल्यामुळे ही धमकी देण्यात आली आहे.

1950-53 च्या युद्धाच्या युद्धविरामाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये प्योंगयांग येथे एका भव्य लष्करी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला संबोधून भाषण करताना लष्कराच्या राजकीय विभागाचे संचालक हवांग प्योंग सो यांनी हा इशारा दिला आहे. ते कोरिअन पिपल्स आर्मीमध्ये व्हाईस मार्शल पगाचे अधिकारी आहेत. नुकत्याच झालेल्या दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या लष्कराच्या कवायतीमध्ये अमेरिकेच्या एका अण्वस्त्र असलेल्या एअरक्राफ्टचा समावेश होता. त्यामुळे तणाव वाढल्याचे ते म्हणाले.

अमेरिकेच्या साम्राज्यवाद्यांनी आमच्या सार्वभौमत्वावर हल्ला केला तर आमची पथके व्हाईट हाऊस आणि पेंटागॉनवर रॉकेटद्वारे अणुहल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे हवांग यांनी सोमवारी टीव्हीवरील एका भाषणात स्पष्ट केले.

अशा प्रकारे अणुहल्ल्याची धमकी देण्याचा उत्तर कोरियाची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अमेरिकेला अशा प्रकारची धमकी दिली आहे. पण तज्ज्ञांच्या मते एवढ्या लांबच्या पल्लयाचे क्षेपणास्त्र तयार करण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. उत्तर कोरियाने आतापर्यंत तीन वेळा अणुचाचणी केली आहे. पण त्यांना अद्याप युद्धात वापर करता येईल असे अण्वस्र तयार करण्यात यश आले नसल्याचे सांगितले जाते. त्यांच्याकडे कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे असल्याने त्यांना केवळ जपान किंवा दक्षिण कोरियापर्यंतच पोहोचता येते. त्यांनी काही दिवसांपूर्वी जपानच्या समुद्रात चाचणीही घेतली होती. या चाचण्यांचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने निषेधही नोंदवला होता.
पुढे पाहा कोरियन युध्‍दाच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित करण्‍यात आलेल्या कार्यक्रमाचे छायाचित्रे....