आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • North Korean Leader Kim Jog Un Now Eye On Uncle Close Aid

मामाला फासावर लटकवल्यानंतर उत्तर कोरियाचे नेते उन यांची नजर आता त्यांच्या निकटवर्तीयांवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल - उत्तर कोरियाचे शक्तिशाली नेते किम जाँग उन यांनी आपल्या मामांना (आत्याचे पती) फासावर लटकवल्यानंतर आता जांग साँग थेक यांचे निकटवर्तीय असलेल्यांवर मृत्युदंडाचे सावट आले आहे. सोमवारी देशाच्या युनेस्कोतील प्रतिनिधीला मायदेशी परत यावे लागले.
किम यांचे राजकीय आदर्श आणि देशात दुस-या स्थानी असलेले जांग साँग थेक यांना 12 डिसेंबर रोजी मृत्युदंड देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर किम यांनी परदेशांतील आपल्या प्रतिनिधींना माघारी येण्याचे फर्मान सोडले आहे.
सत्तेची दोन वर्षे । किम उन सत्तेवर येऊन दोन वर्षे झाल्याच्या निमित्ताने रविवारी सत्ताधारी पक्ष आणि लष्कराच्या अधिका-यांची राष्ट्रीय बैठक झाली. त्या बैठकीचे छायाचित्र.
जांग यांच्या सहका-यांना लटकवले
जांग यांचे सहकारी राहिलेल्या दोन जणांना याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरकारने फासावर लटकवले होते. त्यानंतर जांग यांच्या संपर्कातील व्यक्तींना पदावरून हटवण्याचे संकेत मिळाले होते.
संतापजनक परंपरा
दोन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या किम जाँग उन यांनी घराण्याशी गद्दारी करणा-या व्यक्तींना मृत्युदंड देण्याची विचित्र परंपरा सुरू केली आहे. त्यात रक्ताच्या नात्यातील लोकांनाही क्षमा दिली जात नसल्याचे उघड झाले आहे.
काय आहे कारण ?
जांग यांच्याशी संबंध असलेल्या मुत्सद्द्यांना पदावर ठेवून धोका पत्करावा लागेल, या भयाने पछाडलेले किम यांनी मुत्सद्द्यांना माघारी बोलावण्याचे फर्मान जारी केले आहे. याअगोदर मलेशियातील राजदूताला माघारी परतण्याचे आदेश देण्यात आले होते. स्वीडन, पाकिस्तानातील प्रतिनिधींनाही परतावे लागले.