आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • North Korean Leader Says He’s Open To Summit With South Korea

उ. कोरियाची द. कोरियाशी उच्चस्तरीय चर्चेची तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल - उत्तर कोरियाचे नेते किम जोंग ऊन यांनी गुरुवारी दक्षिण कोरियाशी उच्चस्तरीय चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. ऊन यांनी नववर्षानिमित्त जारी केलेल्या संदेशात दक्षिण कोरियाशी चर्चेचा प्रस्ताव ठेवून आर्श्चयाचा धक्का दिला.

किम यांनी २००७ च्या प्योंगयांग कोरियन परिषदेचा केलेला उल्लेख दक्षिण कोरियातील प्रसारमाध्यमांमध्ये करण्यात आला. दक्षिण कोरियाचे दिवंगत अध्यक्ष रोह मुह्यून आणि उत्तर कोरियाचे दिवंगत नेते किम जोंग या नेत्यांमध्ये त्या वेळी चर्चा झाली होती. सद्य:स्थितीत दाेन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय चर्चेला नकार देण्याचे कोणतेच कारण नाही, असे किम म्हणाले. दक्षिण कोरियाचे मंत्री रयू किहल-जे यांनी जानेवारीत चर्चा करण्याचा प्रस्ताव उत्तर कोरियाला दिला होता.