आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Norway PM Jens Stoltenberg Turns Secret Taxi Driver

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नॉर्वेच्या पंतप्रधानांनी चालवली टॅक्सी, मनमोहनसिंग असे कधी करणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओस्लो (नॉर्वे)- मतदारांची मते जाणून घेण्यासाठी गेल्या जून महिन्यात नॉर्वेचे पंतप्रधान जेन्स स्तोल्टनबर्ग यांनी एका दिवसासाठी चक्क सिक्रेट टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केले. यावेळी ज्या प्रवाशांनी त्यांना ओळखले त्यांना त्यांनी आपली ओळख दिली. जनतेची मते जाणून घेण्यासाठी नॉर्वेच्या पंतप्रधानांनी टॅक्सी ड्रायव्ह म्हणून काम केले असताना आपले पंतप्रधान मनमोहनसिंग जनतेत जाण्यासाठी कधी अशा प्रकारचे फंडे अवलंबतात, याची वाट आता जनता बघत आहे.

नॉर्वेची निवडणूक जाहिर झाल्यानंतर पुन्हा निवडून येण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रचाराचा हा एक भाग असल्याचे सांगण्यात आले आहे. जेन्स स्तोल्टनबर्ग यांनी जेव्हा ओस्लो या शहरात दिवसभर टॅक्सी चालविली तेव्हा त्याचे एका छुप्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून छायाचित्रणही करण्यात आले. याची छायाचित्रे आणि व्हिडिओ रेकॉर्डींग काल (रविवार) पंतप्रधानांच्या फेसबुक पेजवर जाहीर करण्यात आले. स्तोल्टनबर्ग टॅक्सी चालवित असताना ज्या प्रवाशांनी त्यांना ओळखले त्यांना त्यांनी आपली ओळख दिली. यावेळी स्तोल्टनबर्ग यांच्या डोळ्यांवर काळ्या काचा आणि ते टॅक्सी चालकाचा गणवेश घालून असल्याने बहुतेक प्रवाशांनी मात्र त्यांना ओळखले नाही.

निवडणुकीच्या पार्शभूमिवर मला जनतेची मते जाणून घ्यायची होती, असे सांगून जेन्स स्तोल्टनबर्ग म्हणाले, की लोक खुलेपणाने आपली मते मांडत असतील अशी एकमेव जागा आहे आणि ती म्हणजे टॅक्सी. मला राजकारणावर लोकांची मते जाणून घ्यायची होती. त्यामुळे मी टॅक्सी चालविण्याचा निर्णय घेतला होता.

गेल्या आठ वर्षांपासून स्तोल्टनबर्ग नॉर्वेचे पंतप्रधान आहेत. स्तोल्टनबर्ग यांनी टॅक्सी चालविली तेव्हा एका प्रवाशाने तुमचे ड्रायव्हिंग खरचं वाईट आहे, असे सांगितले. दुसऱ्या प्रवाशाने मी जीवंत राहिल अशी टॅक्सी चालवा, असेही म्हटले. तिसऱ्या प्रवाशाने मी तुमच्या टॅक्सी चालविण्यावर समाधानी नाही, अशी पावतीही दिली होती. यावेळी एकाने त्यांना ओळखले खरे पण तुम्ही पंतप्रधानपदावरून पायउतार झाला का, असा विचित्र प्रश्नही विचारला होता.

पुढील छायाचित्रांमध्ये बघा स्तोल्टनबर्ग यांना टॅक्सी चालविताना...