आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृद्धापकाळ आनंदी आणि आरोग्यदायी घालवायचा... तर चला नॉर्वे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - वृद्धापकाळ आनंदी आणि आरोग्यदायी वातावरणात घालवायचा असल्यास नॉर्वे हा देश उत्तम आहे. वृद्धांसाठी अनुकूल सामाजिक आणि आर्थिक वातावरण शोधण्यासाठी ९६ देशांत झालेल्या सर्वेक्षणानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. नॉर्वेनंतर स्विडन, स्वित्झर्लंड आणि कॅनडाचा क्रमांक लागतो. भारत ६९ व्या स्थानावर आहे, तर अफगाणिस्तानने तळ गाठला आहे.

यादीतील टॉप १० देशांमध्ये बहुतांश देश पश्चिम युरोपातील असून उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान नवव्या क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षी स्विडनचा यादीत पहिला क्रमांक होता. यंदा हा देश दुस-या क्रमांकावर आहे.

आर्थिक सुबत्ता महत्त्वाची नव्हे : ही यादी तयार करणा-या हेल्पेज इंटरनॅशनल संस्थेच्या मते, एखाद्या देशातील केवळ आर्थिक सुबत्ताच वृद्धांकरिता योग्य वातावरणनिर्मिती करू शकते, असे नाही. वृद्धांसाठी वेगवेगळ्या योजनाही महत्त्वाच्या ठरतात. उत्पन्नाची सुरक्षितता, आरोग्य स्थिती तसेच रोजगार, शिक्षणविषयक क्षमता आणि शारीरिक सुरक्षेसंबंधी योग्य वातावरण या निकषांवरून ही जागतिक स्तरावरील यादी तयार करण्यात आली आहे.

महत्त्वाचे मुद्दे
१. २०५० पर्यंत जगातील वृद्धांची संख्या २ अब्ज होईल. एवढीच संख्या बालकांची असेल.
२. स्वित्झर्लंडमध्ये वृद्धांसाठी सर्वात चांगले आरोग्यदायी वातावरण आहे.
३. उत्पन्न सुरक्षेविषयीच्या योजना गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगल्या असल्याने मेक्सिको २६ स्थाने ओलांडून ३० व्या क्रमांकावर पोहोचला.
४. अहवालानुसार, नॉर्वेमध्ये सामाजिक संस्था, कल्याणकारी राज्य आणि सोशल मीडियावरील मोहिमांवरून वृद्धांच्या समस्यांप्रती मोठी जनजागृती.