आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॉफ्टवेअरचे पेटंट मिळवणे सोपे नव्हते

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दररोज नवनवे सॉफ्टवेअर बनत असून त्यांचे पेटंट घेतले जात आहे. सॅमसंग आणि अ‍ॅपलचे पेटंट वॉर जगजाहीर झाले आहे. यापैकी अनेक पेटंट अशा सॉफ्टवेअरसाठी आहेत, जे नवे संशोधन नाही. उदाहरणार्थ, अ‍ॅमेझनचा एक क्लिकचे पेटंट किंवा स्क्रीन वापरण्यासाठी अ‍ॅपलचे ‘पिंच टू झूम’ सारखे पेटंट.कंपन्यामधील गळेकापू स्पर्धेमुळे दररोज असे पेटंट दिले जात आहेत, पण सॉफ्टवेअरचे पेटंट मिळवणे तेवढे सोपे नव्हते, हे बहुतेक जणांना ठाऊक नसेल. मार्टिन गोट्ज हे सर्वात पहिले सॉफ्टवेअर पेटंट मिळवणारे व्यक्ती आहेत. त्यांनी संगणकात माहितीचे वर्गीकरण करण्याचे सॉफ्टवेअर तयार केले होते. 1960च्या दशकात आयबीएम आणि इतर हार्डवेअर कंपन्या आपल्या संगणकासोबत असे सॉफ्टवेअर मोफत देत. त्यामुळे मार्टिनप्रमाणेच सॉफ्टवेअर तयार करणा-यांसाठी बाजारात आपले सॉफ्टवेअर विकणे कठीण होते.

आयबीएमसारख्या कंपन्यांना सॉफ्टवेअर मोफत वाटता येऊ नये, तसेच कोणी त्याची नक्कल करू नये, यासाठी सॉफ्टवेअरचे पेटंट करता यावे, असे त्यांना वाटे. मार्टिन यांनी 8 एप्रिल 1965 रोजी पेटंटसाठी अर्ज सादर केला, पण तो फेटाळण्यात आला. मॅथेमॅटिक अल्गोरिदमवर कोणतेही पेटंट मिळू शकत नसल्याचे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे होते. कारण यापूर्वी कोणत्याही सॉफ्टवेअरला पेटंट देण्यात आले नव्हते. मात्र यानंतर अनेक कंपन्यांनी आपल्या नव्याने तयार केलेल्या सॉफ्टवेअरच्या पेटंटसाठी अर्ज करणे सुरू केले. मार्टिन गोट्जला तीन वर्षांच्या प्रयत्नांनंतर 28 एप्रिल 1968 मध्ये सॉफ्टवेअरचे पेटंट मिळाले. अशाप्रकारे सॉफ्टवेअरचे पेटंट मिळवणारे ते पहिले ठरले.


engadget.com