आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादापुढे गुडघे टेकवणार नाही - जपानचे पंतप्रधान अॅबे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो - इसिसच्या दहशतवाद्यांनी आमच्या नागरिकांची तत्काळ सुटका करावी. आम्ही त्यांच्यासमोर गुडघे टेकवणार नसल्याचे जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांनी बुधवारी स्पष्ट केले. दरम्यान, आेलीस संकटाच्या पार्श्वभूमीवर अॅबे मध्य-पूर्वेचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले.

दहशतवाद्यांनी नागरिकांना कसल्याही प्रकारची इजा पोहोचवू नये. आंतरराष्ट्रीय समुदायासोबत आम्ही एकजुटीने दहशतवादाचा मुकाबला करण्यास तयार आहोत, असे अॅबे यांनी सांगितले. ते बुधवारी जेरुसलेम येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. तुमच्या सरकारकडे ७२ तास आहेत. तुम्ही शहाणपणाने निर्णय घेणे अपेक्षित आहे. तुम्हाला तुमच्या नागरिकांचे प्राण हवे असल्यास १२०० कोटी रुपयांची रक्कम आम्हाला दिली पाहिजे, असे दहशतवाद्यांनी म्हटले आहे. दोन जपानी अपहृत नागरिकांच्या सुटकेसाठी १२०० कोटी रुपयांची मागणी ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने केली होती. १२०० कोटी रुपयांची मागणी मंगळवारी इसिससने केली. दोन अपहृतांचा एक व्हिडिओ दहशतवाद्यांनी मंगळवारी प्रसिद्ध केला होता. दहशतवादी संघटनांच्या संकेतस्थळावर हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. व्हिडिओमध्ये दोन जपानी नागरिक बसलेले असून केंजी गोटो हरुणा याकुवा अशी त्यांची नावे असल्याचा दावा करण्यात आला. आतापर्यंत जपानला दहशतवादाचा अशा प्रकारे मुकाबला करावा लागला नव्हता. दरम्यान, अॅबे यांनी शनिवारी इजिप्त दौ-यावर असताना २.५ अब्ज डाॅलर्सची मदत जाहीर केली होती.