आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Following Sleep Timetable Effect Children, Research In Britain

अवेळी झोप मुलांचे आरोग्य बिघडवते, ब्रिटनमधील संशोधनाचा निष्‍कर्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - पालकांनो, ही बातमी तुमच्यासाठीच आहे. लहान मुलांच्या आरोग्याची चिंता सतावत असेल तर त्यांच्या झोपेबद्दल वेळीच सावध व्हा, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनकडून (यूसीएल) यासंदर्भातील संशोधन करण्यात आले आहे. मुलांच्या झोपेच्या वेळा सांभाळणे फार महत्त्वाचे आहे. त्यात अनियमितपणा आल्यास अनेक प्रकारे त्रास संभवतो. त्याचबरोबर शरीराची असलेली लयदेखील बिघडून जाण्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्यातून वर्तनात दोष निर्माण होऊ शकतो. हाच त्यांच्या आरोग्याचा पाया असतो. त्यावरच पुढील आयुष्य अवलंबून असते, असे प्रोफेसर योवॉन केली म्हणाले.

यूसीएलच्या चमूने ब्रिटनमधील 10 हजार मुलांचा अभ्यास केला. मुले चिडचिडी होऊ लागतात. एखाद्या गोष्टीतील एकाग्रताही त्यांना साधता येत नाही. अशी मुले अनेकदा हायपर अ‍ॅक्टिव्ह बनतात. त्याचबरोबर भावनिक पातळीवरदेखील त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.