आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांच्‍या चेह-यावरील माशा उडेना....

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बराक ओबामा म्हणजे माशांसाठी एक हक्काचे ठिकाण बनले आहे. व्हाइट हाऊसमध्ये नुकत्याच झालेल्या स्टेट डायनिंग रूममधील चर्चेदरम्यान ते माशांमुळे खूपच हैराण झाले.माशीनेही जगभरातील वर्तमानपत्रांत जागा मिळवली. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा दुस-या कार्यकाळातील दोन नव्या सदस्यांची घोषणा करत होते तेव्हा एक माशी त्यांच्या कपाळावर येऊन बसली. चिडून ओबामा म्हणाले, ही माशी खूप त्रास देत आहे. पण त्या अवस्थेतही त्यांनी 5 मिनिटे भाषण केले.


ओबामांच्या चेह-या वरील माशी पहिल्यांदाच कॅमे-यात कैद झाली आहे असे नाही. ओबामा आणि माशीचे जुने नाते आहे. 2009 मध्ये राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यावर एका टीव्ही चॅनलच्या मुलाखतीदरम्यान ते अनेक वेळा माशांमुळे थांबले तरीही माशा त्यांच्याभोवती घोंगावतच होत्या. अखेर त्यांनी मुलाखत अर्धवट सोडली. 2010 मध्ये हेल्थ केअर रिफॉर्मवर भाषण देत असताना ते एका अमेरिकन महिलेच्या संघर्षाची भावुक कथा सांगत होते. त्या वेळीही माशांमुळे त्यांना भाषण अर्ध्यावरच सोडावे लागले. तेव्हाची माशी त्यांच्या नाकावर बसली होती. त्या वेळी ओबामांनी माशीला तेथून हाकलून द्यायला सांगितले होते. आधी ते या छोट्या किड्यामुळे मुलाखतच सोडून जात होते पण बदल झाला आहे. ते परिस्थिती सांभाळून घेतात.


telegraph.co.uk