आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Make Commonwealth For Punishing Institution, Srilankan President Appeal

‘राष्‍ट्रकुल’ला शिक्षा देणारी संस्था बनवू नका, श्रीलंकन राष्‍ट्रपतींचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - तामिळी नागरिकांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याच्या प्रकरणावरून तीव्र विरोधाला सामोरे जाव्या लागलेल्या चोगम गाजत असलेल्या राष्‍ट्रकुल देशांतील प्रमुखांच्या शिखर परिषदेस (चोगम) शुक्रवारी येथे सुरुवात झाली. ‘राष्‍ट्रकुल’ला दंड देणारी कायदेशीर संस्था बनवू नका, असे आवाहन श्रीलंकेचे राष्‍ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी केले. राष्‍ट्रकुल देशांनी द्विपक्षीय अजेंडा लागू करण्यापासूनही दूर राहिले पाहिजे. तसेच गरिबी दूर करण्याला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी सदस्य देशांना केले.
ब्रिटनचे युवराज प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते नीलम पोकुना (कमल कुंड) महिंदा राजपक्षे थिएटरमध्ये 22 व्या चोगम परिषदेचे उद्घाटन झाले. या थिएटरची उभारणी चीनने केली आहे. उद्घाटन समारंभास ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरॉन, भारताचे परराष्‍ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांच्यासह 53 देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. मॉरिशसने या परिषदेवर बहिष्कार टाकला आहे. तसेच 2015 मध्ये कॉमनवेल्थ संमेलनाचे आयोजन न करण्याचीही घोषणा केली आहे. ब्रिटन व कॅनडा लिट्टेच्या विरोधात अभियानाच्या काळात मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित करू इच्छितात, परंतु राजपक्षे यांनी उद्घाटनर भाषणाचा लाभ उठवत आपल्या सर्वच विरोधकांना उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, जर ‘राष्‍ट्रकुल’ला एकजूट राहायचे असेल तर जनतेच्या गरजा लक्षात घ्याव्या लागतील. भगवान बुद्धांच्या शब्दांचा उल्लेख करत त्यांनी जे केले आहे, त्याचीच आपण चिंता करावी, जे केलेच नाही, त्याची नको, असे मत व्यक्त केले.
यांची अनुपस्थिती चर्चेत
तामिळनाडूच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांनी विरोध केल्यामुळे पंतप्रधान मनमोहनसिंग संमेलनात गेले नाहीत. त्यांच्याऐवजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद हे भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. मॉरिशसच्या पंतप्रधानांऐवजी परराष्‍ट्रमंत्री व कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांचे संसदीय सचिव दीपक ओबेरॉय उपस्थित आहेत.
कॅमरॉन उत्तर श्रीलंकेत: ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरॉन हे उत्तर श्रीलंकेत जाणारे पहिले नेते ठरले आहेत. 1948 नंतर एखादा नेता प्रथमच या ठिकाणी गेला आहे. येथे कॅमरॉन यांनी तामिळ अल्पसंख्याकांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जाफना येथील ग्रंथालयासही त्यांनी भेट दिली. नवे मुख्यमंत्री सी. व्ही.विग्नेश्वरन यांची त्यांनी भेट घेतली. हा प्रांत लिट्टेच्या नियंत्रणात होता. त्याचा खात्मा केल्यानंतर श्रीलंकन सरकार तेथे लक्ष देत आहे. या दौ-यावर बहिष्कार टाकण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करून कॅमरॉन येथे आले आहेत.