आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Make People Fool, Mushraff Said To Pak Government

लोकांना मूर्ख बनवू नका,मुशर्रफ यांनी पाक सरकारला सुनावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - दुबईत असलेल्या आजारी आईला मायदेशात आणण्याची भाषा करणा-या सरकारचा आभारी आहे. परंतु या मुद्द्यावरून लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दांत माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी सरकारला सुनावले.
मुशर्रफ यांची 95 वर्षीय आई दुबईत आहेत. त्यांना विशेष विमानाने पाकिस्तानात आणण्याची सरकारची तयारी असल्याचे वृत्त आहे. त्या पार्श्वभूमीवर मुशर्रफ यांच्याकडून हे स्पष्टीकरण आले आहे. शनिवारी मुशर्रफ यांचे प्रवक्ते आसिया इशक यांनी ही भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली. खरे तर सरकार लोकांना या मुद्द्यावर मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहे. मुशर्रफ यांचे दुबईत पुरेसे स्त्रोत आहेत. त्यामुळे ते आपल्या आईला सहजपणे आणू शकतात. परंतु आईची प्रकृती सध्या साथ देत नाहीत. सध्या मुशर्रफ यांच्यावर प्रचंड दबाव टाकण्यात येत आहे. तरीही त्यांनी मायदेश सोडून जाण्याचा विचार केलेला नाही. याची सरकारला देखील कल्पना आहे. त्यामुळे सरकारची ही आॅफर साळसूदपणाची आहे. मुर्शरफ हे कायद्याची लढाई लढत आहेत. ते त्यासाठी तयार आहेत.
70 वर्षीय मुशर्रफ यांच्यावर देशात आणीबाणी लादल्याचा ठपका आहे. याशिवाय इतरही अनेक खटले त्यांच्यावर सुरू आहेत. त्यामुळे सध्या तरी त्यांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सत्तांतर होण्यापूर्वी मुशर्रफ मायदेशी परतले होते. मात्र, निवडणुकीत त्यांच्या पक्षाला पराभव स्विकारावा लागला.
1 जानेवारीला सुनावणी
माजी लष्करशहा मुशर्रफ यांच्यावरील खटल्याची पुढील सुनावणी 1 जानेवारीला होणार आहे. 2007 मध्ये आणीबाणी लादल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. देशद्रोहाच्या खटल्याचा सामना करणारे मुशर्रफ हे देशातील पहिलेच लष्करशहा आहेत. दोषी ठरले तर त्यांना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते.