आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता 30 सेकंदांत पेय थंड करणारे उपकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - रेफ्रिजरेटरला पर्याय उपलब्ध झाला आहे. शीतपेय 30 ते 60 सेकंदांत थंड करू शकणारे पोर्टेबल उपकरण विकसित करण्यात आले आहे. उष्णता स्थलांतरित होण्याच्या मूलभूत तत्त्वाचा वापर करून सोडा किंवा बिअर अर्ध्या मिनिटात थंड करता येऊ शकेल, असा दावा उत्पादकांनी केला आहे.

फ्रिजरमध्ये कॅन किंवा बॉटल ठेवल्यानंतर 20-30 सेकंदांत ते पेय पिण्यायोग्य होते. बर्फाच्या पाण्यात ठेवल्यानंतर त्यासाठी 10-20 मिनिटे लागतात. ‘चिल बीट’ उपकरणाचा वापर केल्यास त्यासाठी केवळ 30-60 सेकंद लागतात, असा दावा आहे. नव्या उपकरणात उष्णता स्थलांतरित होण्याचा दर 20 पटींनी वाढतो.