आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता बटाटे सडणे केवळ अशक्यच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन-ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी जनुकीय फेरबदल (जीएम) करून कधीही न सडणारे बटाटे विकसित केले आहेत.
शास्त्रज्ञांनी तब्बल तीन वर्षे या जीएम बटाट्यांच्या चाचण्या घेतल्या. लेट ब्लाइट म्हणजेच बुरशीमुळे बटाटे सडत असल्यामुळे शेतकर्‍यांच्या अनेक पिढ्या हैराण होत्या. बुरशीमुळे बटाटे सडण्याचे प्रमाण मोठे असल्यामुळेच 1840 मध्ये आयर्लंडमध्ये शेतकर्‍यांनी बटाट्याची शेती करणेच सोडून दिल्याने बटाट्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली होती. हे नवे संशोधन ब्रिटनच्या फिलॉसॉफिकल ट्रान्झॅक्शन ऑफ द रॉयल सोसायटीच्या संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाले आहे.बटाटे हे अशा प्रकारे सडवणार्‍या बुरशीचे सर्वात मोठे लक्ष्य आहे. सादळलेल्या वातावरणात ही बुरशी अतिशय वेगाने वाढते. ब्रिटनमध्ये बटाटे उत्पादनाच्या हंगामातच विशेषत: असे सादळलेले वातावरण असते.
बियाणे महाग, पण खर्च कमी
सामान्य बटाट्यांपेक्षा शेतकर्‍यांना या बटाट्याचे बियाणे थोडे महाग विकत घ्यावे लागणार आहे; पण बटाटे सडू नयेत म्हणून कराव्या लागणार्‍या खर्चात मात्र लक्षणीय बचत होईल, असे सेन्सबरी प्रयोगशाळेतील संशोधक जोनाथन जोन्स यांनी म्हटले आहे.
कसे केले संशोधन?
ब्रिटिश शास्त्रज्ञांनी दक्षिण अमेरिकी जंगलातील लाल रंगाच्या बटाट्यातील एक जनुक टाकले की, त्यामुळे ब्लेट लाइट बुरशीपासून बचाव करण्याची नैसर्गिक क्षमता या बटाट्यांमध्ये विकसित झाली. त्याचे उत्पादन सामान्य बटाट्यांच्या तुलनेत दुप्पट आहे.
चवीचा प्रश्न : जनुकीय फेरबदल केलेले बटाटे परीक्षणादरम्यान खाण्यास मनाई करण्यात आली होती; चवीबद्दल फारशी माहिती दिली नाही. परंतु या बटाट्यांची चव बदलण्याचा प्रश्नच नसल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे.