आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Marriage Reception Organises In Macdonald In England

इंग्लंडमध्‍ये लग्नानंतरचा स्वागत सोहळा रंगणार मॅकडोनाल्डमध्‍ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - इंग्लंडमधील फास्ट फूडप्रेमींसाठी मॅकडोनाल्डने एक खास संधी उपलब्ध करून दिली आहे. नवविवाहित दांपत्ये मॅकडोनाल्डच्या स्थानिक आऊटलेटमध्ये पाहुण्यांना लग्नाची मेजवानीही देऊ शकतील. अशा प्रकारे विवाहानंतर पाहुण्यांना मॅकडोनाल्डमध्ये रिसेप्शन देण्याची ही पद्धत दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणावर प्रचलित होत आहे. अशा प्रकारच्या पर्यायामुळे नवविवाहित दांपत्ये आनंदी झाली आहेत. नुकताच विवाह झालेल्या स्टीव्हन आणि एमिली यांनी सांगितले की, ‘आम्ही गेले एक वर्ष मॅकडोनाल्डच्याच आऊटलेटमध्ये भेटत होतो. या ठिकाणी आमच्या अनेक आठवणी आहेत. त्यामुळे लग्नाचा आनंद इतरांबरोबर वाटून घेण्यासाठी यापेक्षा आणखी चांगली जागा असूच शकत नाही.’