आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुकेवर नियंत्रण मिळवणे शक्य!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - विज्ञानाच्या साह्याने भुकेवर नियंत्रण मिळवता येऊ शकते का? कदाचित या प्रश्नाचे उत्तर हो असेच मिळू शकते. शास्त्रज्ञांनी भूक नियंत्रणात आणण्याची क्षमता असलेल्या मेंदूतील अशा पेशींच्या एका समूहाचा शोध लावला आहे. या पेशींमुळेच खानपानाच्या सवयीत गडबड होते आणि स्थूलपणा येऊ शकतो.

उंदीर, खार आणि अन्य कुरतडणार्‍या प्राण्यांवर करण्यात आलेल्या प्रयोगात मेंदूतील टेनिसायटिस नावाच्या पेशी न्यूरॉनची निर्मिती करतात, असे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. न्यूरॉन हे मुख्यत्वे करून भूक नियंत्रित करण्याचे काम करते. शास्त्रज्ञांना मिळालेल्या या माहितीमुळे मेंदूतील मूळ पेशींबाबतच्या ज्ञानात आणखी भर पडणार असून भुकेवर नियंत्रण मिळवणार्‍या न्यूरॉनची संख्या आणि त्यांचे व्यवस्थापन करणार्‍या औषधांची निर्मिती करण्याच्या प्रयत्नांना गती मिळणार आहे.

जन्मापासून निश्चित नसते भूक : भूक जन्मत:च निश्चित नसते, असे ईस्ट अँग्लिया विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. याआधी भूक नियंत्रित करणार्‍या मेंदूतील पेशी भ्रूणाच्या गर्भातील विकासाच्या वेळीच तयार होतात आणि नंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येत नाही.

स्थूलपणावर रामबाण
भूक नियंत्रित करणार्‍या धमन्यांच्या साखळीची संख्या निश्चित नाही. खाण्याशी संबंधित विकारावर उपाय करण्यासाठी त्यांच्या संख्येत फेरबदल करता येऊ शकतो. मात्र, या शोधामुळे स्थूलपणाच्या समस्येवर रामबाण उपाय शोधण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, असे ईस्ट अँग्लिया विद्यापीठाच्या स्कूल आॅफ सोशल सायन्सचे मुख्य संशोधक महंमद हाजी हुसेनी यांनी म्हटले आहे.